आज 25 ऑगस्ट वर्षातील सर्वात मोठी संकष्टी… रात्री बाप्पाला दाखवा हा नैवद्य, तुमची सगळी संकटं होतील दूर…

नमस्कार मित्रांनो,

आज दिनांक 25 ऑगस्ट बुधवार. आजचा दिवस एकदम खास आहे. आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची चतुर्थी आहे. बुधवार हा बाप्पाचा दिवस मानला जातो. त्यामुळे आजच्या संकष्टी चतुर्थीला अत्यंत महत्व आहे.

चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशाचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. आजच्या चतुर्थीला खूप महत्व आहे. आज या दिवशी बरेच लोक व्र त वैकल्य करतात, उप वास करतात, पूजा पाठ करतात तसेच गणपती बाप्पांचे नाम स्मरण, अथर्वशीर्ष पठण सुद्धा करतात.

आज बुधवारी या संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणपती बाप्पाना हा विशेष नैवद्य तुम्ही दाखवाच. बाप्पांना नैवैद्यामध्ये हा पदार्थ अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नैवेद्य दाखवा. श्री गणेश अत्यंत प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील.

हा नैवेद्य दाखवल्यामुळे तुमचे सर्व संकटं विघ्नहर्ता गणेश दूर करतील. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतील. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल सोबतच आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. म्हणून मित्रांनो या संकष्ट चतुर्थीला गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हा नैवद्य तुम्ही गणेशाला नक्की दाखवा.

मित्रांनो संकष्टी चतुर्थीला बरेच व्यक्ती उपवास करतात. आजच्या दिवशी संध्याकाळी जेवणाच्या आधी गणपती बाप्पांना आपल्याला हा नैवद्य दाखवायचा आहे. आणि तोच नैवद्य ज्यांचा उपावास असेल किंवा ज्यांचा नसेल त्या सर्वानी वाटून खायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला नैवैद्यामध्ये गणपती बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवायचा आहे. पण हे मोदक काहीतरी वेगळे आणि विशेष असणार आहेत. तर मित्रांनो बरेच लोक मोदक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उकडीचे, खोबऱ्याचे, साखरेचे किंवा पुरणाचे असे बऱ्याच पद्धतीचे मोदक बनवता येतात.

मित्रांनो तुम्ही कोणतेही मोदक करा पण तुम्ही मोदक बनवताना आपण जे सारण बनवाल त्यात तुम्हाला एक वस्तू घालायची आहे. ती वस्तू म्हणजे एक छोटासा गुळाचा खडा त्यात टाकायचा आहे. नखाच्या आकाराचा छोटासा गुळाचा तुकडा तुम्हाला प्रत्येक मोदका मध्ये टाकायचा आहे.

मित्रांनो मोदकाचे सारण बनवताना साखरे ऐवजी गूळ वापरला तरी चालेल. पण लक्षात असुद्या सारणात गूळ टाकणे अत्यंत आवश्यक आहे. हा संकष्टी चतुर्थीचा खास आणि विशेष असा नैवेद्य आहे.

ज्यांना मोदकाचा नैवद्य करणे शक्य नसेल त्यांनी खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे आणि त्यावर गूळ ठेवून बाप्पांना तो नैवद्य दाखवायचा आहे. तर मित्रांनो आज संकष्टीच्या दिवशी श्री गणेशाला हा नैवद्य दाखवायला तुम्ही अजिबात विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.