खाऊन भंडारा, झाला रोग बरा… संत बाळू मामांची सत्य घटना… नक्की जाणून घ्या…

नमस्कार मित्रांनो,

बाळूमामांच्या नावानं चांगभलं. मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापुरात बाळू मामांचे देवस्थान आहे. अनेक लोकांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी आल्याने आणि बाळू मामांचे दर्शन घेतल्याने अनेक असाध्य रोग हे बरे होतात.


मित्रांनो इथे दर्शन घेतल्याने अनेक शारीरिक पीडा दूर होतात. अनेक जण अशा गोष्टी मानत नाहीत, या सर्व गोष्टींना ते अंध श्रद्धा मानतात. मित्रांनो अशा लोकांसाठी ही पोस्ट नाही आहे.

मोठ्यात मोठे आजार बरे करण्याची क्षमता देव पुरुषांच्या मध्ये असते. बाळू मामा अशा लोकांपैकीच एक आहेत. बाळू मामा प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत, अंश आहेत.


मित्रांनो अनेक जणांना पॅरा लिसिस झालेला असतो, हात पाय लुळे पडले आहेत. अजूनही काही आजार आहेत जे बरे होत नाहीत, डॉक्टरांनी गुढघे टेकले आहेत. वैद्यकीय उपचार अपुरे पडत आहेत.

आपण भरपूर उपचार केले, पैसा खर्च केला तरी फरक पडत नाही. यावर कोणता उपाय करावा असा प्रश्न या लोकांना पडलेला असतो. मित्रांनो आपण कोणताही उपाय करा.

मित्रांनो पण त्या आधी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथे नक्की या आणि संत बाळू मामा यांचे दर्शन घ्या. त्यांचा भंडारा आपल्या माथी लावा. त्यांचा प्रसाद आपल्या कुटुंबा सोबत खा.

जर आपल्यावर बाळू मामा प्रसन्न झाले, त्यांचा आशीर्वाद मिळाला तर आपल्याला त्या आजारातून नक्की मुक्ती मिळेल.

मित्रांनो एक छोटी कथा जाणून घेऊया ज्यामुळे आपला सुद्धा संत बाळू मामा यांच्यावर विश्वास बसेल, तुमची श्रद्धा वाढेल.

कथा अशी आहे, बळीराम गोपाळ लाडगावकर, राहणार अर्जुनवाडा, तालुका कागल. हे विठू पाटील यांचे जावई. त्यांच्या पत्नीचे नाव जनाबाई.

मित्रांनो जनाबाईना आपल्या माहेर घरापासूनच संत बाळू मामा यांची भक्ती होती. त्यांची बाळू मामा यांच्यावर श्रद्धा होती.

दुर्दैवाने लग्नानंतर काही दिवसातच जनाबाईचा नवरा म्हणजे बळीराम हा क्ष य रो गाने आजारी पडला. क्ष य रो ग म्हणजे टी बी. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार केले, डॉक्टरांना दाखवलं. पण त्यांचा आजार कमी झाला नाही तो वाढतच चालला होता.

एक वेळ अशी आली की बळीराम यांनी जगण्याची आशा सोडून दिली. परदेशात शिकून मिरजेत दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा हा पेशंट जगू शकणार नाही असा अहवाल दिला.

अशा परिस्थितीत काय करावं कोणाला काहीच सुचत नव्हते. शेवटी जनाबाई यांनी आपल्या पतीला, बळीराम ला बाळू मामा यांच्याकडे आणलं. बाळू मामांच्या चरणी बसून त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.

त्यावेळी बाळू मामा म्हणाले की एवढे शिकलेले डॉक्टर सांगतात तर मी काय करणार. मी एक साधा धनगर आहे. मी काय करणार.

तेव्हा जनाबाई मामांना म्हणाल्या, मामा तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला असं दूर करू नका. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. जनाबाईची ती प्रार्थना आणि रडवेला चेहरा पाहून मामा म्हणाले की बरं. हा भंडारा खावा. आणि कण्याचा प्रसाद खावा. मग बघू काय होतंय.

मित्रांनो मामांनी या ठिकाणी भंडारा आणि कण्या बळीराम ला खायला दिल्या. अनेक जण म्हणतील की भंडारा आणि कण्या ने रोग कसा बरा होईल.

त्यानंतर काही दिवस बळीराम ने रोज भंडारा आणि कण्या खाल्ल्या आणि आश्चर्य म्हणजे बळीराम हे टीबी तुन बरे झाले. मित्रांनो 1994 पर्यंत म्हणजे वयाच्या 60 व्या वर्षा पर्यंत बळीराम ठणठणीत राहिले.

मित्रांनो या ठिकाणी भंडारा आणि कण्या हे फक्त कृपेच प्रतीक आहे. वास्तविक त्यांच्या मनातील संकल्प सत्य स्वरूप होता. आणि त्याच मुळे बळीराम बरे झाले.

तुमच्या आमच्या सारख्या लोकांमध्ये आत्मबळ खूप कमी असतं. आणि त्यामुळे आपल्याला सत्य संकल्प करणं शक्य नसतं. पण संत पुरुष जे असतात ते अशा प्रकारचा सत्य संकल्प करू शकतात. त्यांच्या पुण्याई ने आपले रोग बरे होऊ शकतात.

मित्रांनो आपण आजही आदमापुरात जाऊन बाळूमामांचे दर्शन घेऊ शकतो. तिथे असलेल्या मूर्तीकडे पाहिल्यावर प्रत्यक्ष बाळू मामा भेटल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने तुमचे सगळे आजार आणि रोग नाहीसे होतील. एकवेळ त्यांचं दर्शन अवश्य घ्या.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.