ओम नमो नारायणाय बाळुमामाच्या नावानं चांगभलं.
मित्रांनो बाळूमामा आपल्या भक्तांची आणि सेवकांची परिक्षा नक्की पाहतात. पण या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न नक्की करा, एकदा बुद्धमूर गावी मामाचा मुक्काम होता.
या बुद्धमूर गावी मुक्कामी असताना मामांची बकरी कोणत्या तरी विचित्र आजाराने मरण पावली. त्यावेळी त्यानी निलाप्पाला ऐक औषध आणण्यास जवळच्या गावास पाठवले, निलाप्पा स्वामीसह जवळच्या निगापूर गावाला निघाला.
निगापुरात यलप्पा नावाचा धनगर होता यलप्पा धनगराला या रोगावरच ओषध ठाऊक होतं, यलप्पा धनगराकडे स्वामी आणि नीलाप्पा गेले तेव्हा यलप्पाने सांगितले.
कि डाव्हा बाजुला सुकलेल्या कडुनिबांची सालं आपल्याला शोधावी लागेल, यावेळी रात्रत्यावेळी रात्र झालेली होती आणि या रात्रीतच हे तिघे जण काठी, कुऱ्हाड, कंदील, विळा म्हणजेचं खुरपे हातात घेऊन राणामध्ये हि वनस्पती शोधण्यासाठी, हे झाडं शोधण्यासाठी निघाले.
हे तीघेजण राणात चालले असताना, वाटेमध्ये विचित्र गोष्टी घडू लागल्या जसं की सर्वांत प्रथम एका मोठया देवळासारकं काहीतरी दिसलं, आकाशामध्ये अत्यन्त तेजस्वी प्रकाश दिसला आणि काही क्षणांतच हा प्रकाश आणि हे देऊळं एकदम बंद झाले.
दिसेनासे झाले एवढे आत्ता जंगलात त्यांना औषधाचे झाडं दिसले, मग त्या झाडाची रीतीनुसार पूजाकेली, आणि यां झाडाची साल आणि गाभा काडू लागले मात्र त्याच्या हातातील कुऱ्हाड अनिश्चितपणे निसटून खाली पडली.
त्यामूळे स्वामी भयभीत झाले आणि त्याने निलप्पाला हाक दिली त्यावेळी निलाप्पाने बाळुमामानांकडून आणलेला भंडारा त्या झाडांवर फेकला, आणि त्यानंतर झाडाची पाने झोडपूण ती जमीनीवर पडू न देता कांबळ्यात वरचेवर झेलुन गोळा केली.
अशा प्रकारे या झाडाची सामग्री गोळा करून परत येत असताना, त्यांना ऐक वाटेत कुत्रा भेटला, तो अत्यंत भयंकर आणि उग्र होता, त्याचं ते भुकंन एकूण तिघेही हादरले घाबरले, त्या धांदलीत त्यांची फाटाफूट झाली.
<
ते जमेलत्या दिशेने धावू लागले, एवढ्यात आकाशातून अतिशय भयंकर अशा प्रकारचे आवाज येऊ लागले या सगळ्याचा परिणाम असा झाला की स्वामी बेशुद्ध पडला, स्वामी बेशुद्ध पडला त्याला जाग आली.
ती सूर्योदयच्यावेळी त्याने पाहिलं निलाप्पा त्याच्या जवळ कोणीही नव्हतं आणि मग तो एकाकी त्या गावाच्या दिशेने चालूलागला मात्र योगायोगाने ओढ्च्याकाठी निलाप्पा यलाप्पा हे स्वामीला भेटले, आणि मग तिधुहून एकत्रपणे हे तिघे बाळूमामांकडे बुधमुरला चालत गेले.
मामानं जवळ पोहचताच मामांनी वाटेत घडलेले सर्वच्या सर्व विचित्र्य प्रकार अगदी क्रमवार त्या तिघांना सांगितले. बाळूमामा म्हणाले कि मी तुमची परीक्षा बघितली. जो आज्ञा देतो त्यांच्या सेवकांच्या रक्षणाची जबाबदारी असते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.