शनिवारी चुकूनही खरेदी करू नका ही एक वस्तू… पाठी लागेल शनीची साडेसाती…

नमस्कार मित्रांनो,

आठवड्यातील अंतिम वार म्हणजे शनिवार. या शनिवारी अनेक लोक शनि देवांची पूजा करतात. असे म्हणतात शनिवारी शनि देवांची पूजा केल्याने सर्व दुःखातून, समस्यातून आपल्याला मुक्ती मिळते.

अनेक लोक शनि देवांसोबत भगवान भैरवनाथाचीही पूजा करतात. शनीवारवर शनि देवांचा प्रचंड प्रभाव असतो. म्हणून या दिवशी काही कार्य आपण चुकूनही करू नयेत. याउलट काही कार्य हे अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतात.

हिंदुधर्मशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी पूर्व, उत्तर आणि ईशान्य या तिन्ही दिशांना महत्वाच्या कामासाठी प्रवास करू नये. हा प्रवास आपलं काम असफल करतं. विशेष करून ज्योतिषशास्त्रानुसार पूर्व दिशेला दिशाशूल असतो. म्हणून या दिशेला प्रवास करू नये.

जर प्रवास करणे अत्यंत आवश्यक असेल अश्यावेळी थोडासा आल्याचा तुकडा आपल्या तोंडात टाकून आणि 5 पावले उलटे चालून म्हणजे 5 पावले मागे चालून मग प्रवास करू शकता.

या दिवशी आपल्या घरातील मुलीला सासरी पाठवणंसुध्दा टाळावं. तसेच शनिवारी काही वस्तू खरेदी करणं टाळावं. यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होतात.

या वस्तूमध्ये तेल, लाकूड, कोळसा, मीठ आणि लोखंडाची कोणतीही वस्तू या गोष्टींचा समावेश आहे. शनिवारच्या दिवशी या वस्तू खरेदी करणं टाळा.

ज्या लोकांच्या जीवनात शनिची साडेसाती चालू आहे अश्या लोकांनी शनिवारी केस, नखे कापणे या गोष्टी टाळा. या दिवशी मिठाची खरेदी करणे टाळा.ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मीठ खरेदी केल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर चढतो.

अगदी या न त्या कारणामुळे कर्ज काढावं लागतं आणि हे कर्ज फेडता फेडत नाही. या दिवशी पेन, कागद आणि झाडूची ही खरेदी टाळावी. या गोष्टींच्या खरेदीमुळे पैसा घरात टिकत नाही.मात्र विशिष्ट तिथींना म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा किंवा एखादी विशेष तिथी आहे किंवा एखादा विशेष उपाय , टोटका करण्यासाठी झाडू खरेदी करणार असाल तर शनिवारी अवश्य खरेदी करु शकता.

जर आपल्याला शनिची साडेसाती असेल तर शनिवारी दही, दुधाचं सेवन टाळावं. जर दूध प्यायचंच असेल तर त्यात हळद आणि थोडासा गूळ टाकावा. ह्या दिवशी वांग, कैरीचं लोणचं किंवा लाल मिरची या वस्तू खाणं आपण कटाक्षाने टाळावं. या दिवशी असत्य वचन बोलू नये.

शनिदेव हे आपल्याला आपल्या चांगल्या कामाचे फळ नक्की देतात मात्र कळत नकळत जरी तुमच्या हातून काही चुका घडल्या तर त्याची शिक्षा करण्यास ते मागेपुढे पाहत नाही.

ह्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका. शनिवारी जेवणात तेलाचा वापर करू नका. ज्याप्रमाणे आपण गुरुवारी आपल्या कामाची क्षमा मागतो त्याप्रमाणे शनिवारीसुद्धा आपल्या कर्माची क्षमायाचना शनिदेवपुढे करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही.

आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *