आज गुरुवार 24 जून वटपौर्णिमा… अशी करा पूजा… 99% महिला करतात चुकीची पूजा…

नमस्कार मित्रांनो,

ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी उत्तम आरोग्य आणि वडा प्रमाणे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

यंदा वटपौर्णिमा 24 जून गुरुवारी आलेली आहे. शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार मानले जाते की, सावित्रीने आपल्या पतीस यम द्वारातून परत आणले होते. सत्यवानाचे प्रा ण सावित्रीने वडाच्या झाडाखाली यम देवतेकडून परत घेतले होते. म्हणून जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली.

मग आजच्या माहितीमध्ये आपण वटपौर्णिमेच्या पूजेचे महत्व, मुहूर्त तसेच त्यासाठी लागणारे पूजा साहित्य काय लागणार आहे. मंत्र कोणता म्हणावा. त्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो वटपौर्णिमेला शास्त्र प्रमाणे जे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. वड हे औ षधी गुणांनी युक्त, दीर्घायुषी असल्यामुळे आपल्या पतीला, आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभावे.

पर्यावरण प्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून ही परंपरा जोपासली आहे. ही वटपौर्णिमा तिथि प्रारंभ 24 जून पहाटे 03:32 ला होणार आहे आणि 25 जून मध्यरात्री 12:09 मिनिटाला ही तिथी समाप्त होणार आहे.

आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी याविषयी जाणून घेणार आहोत. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठावे. त्यानंतर स्नानादी नित्य निवृत्त होऊन अंगणामध्ये सुंदरशी रांगोळी काढावी.

तसेच सुर्योदय झाल्यावर प्रथम सूर्याला जल अर्पण करावे. त्यानंतर आपल्या घरी पूजा स्थळी नित्य पूजा करून घ्यावी आणि पूजा करत असताना आपण आपल्या या व्रताचा संकल्प करावा.

हा संकल्प करत असताना हे व्रत मी माझ्या पती, कुटुंब यांच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच आरोग्य संपन्नतेसाठी आजचे हे व्रत करणार आहे. हे व्रत शुभ संपन्न होवो असा संकल्प करायचा आहे.

त्यानंतर आपण वडाच्या झाडाच्या खोडाच्या ठिकाणी एका पात्रांमध्ये नदीकाठची वाळू घ्यायची आहे. त्यावर श्री गणेश, सती माता यांच्या प्रतीकात्मक सुपार्‍याची स्थापना करायची आहे.

अथवा आपल्याकडे फोटो असेल तर तो फोटो लावला तरी देखील चालेल. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला प्रथम पूजनीय श्री गणेशाचे पूजन करायचे आहे. त्यानंतर सती मातेचे पूजन करायचे आहे.

सती मातेला हळद-कुंकू, हिरव्या बांगड्या इत्यादी सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत. तसेच मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्नता आणि दीर्घायुष्य लागू दे, कुटुंबामध्ये सुख-शांती येऊ दे, पुत्रांना देखील दीर्घ आयुष्य लाभू दे अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर वडास जल अर्पण करायचे आहे. तसेच जल अर्पण करून झाल्यावरती वडाला हळद कुंकू, आंबे व दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. व हात जोडून नमस्कार करायचा आहे.

त्यानंतर वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळताना सात प्रदक्षिणा घालायच्या आहे. हा दोरा गुंडाळत असताना आपण या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे.

अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते।
पुत्रान्‌ पौत्रांश्च सौख्यं च गृहाणार्घ्यं नमोऽस्तुते।।

हा मंत्र आपण प्रदक्षिणा घालत असताना म्हणायचं आहे. त्यानंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करून पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरायची आहे आणि मग सावित्रीच्या कथेचे श्रवण करायचे आहे.

या दिवशी व्रत करून दुसऱ्या दिवशी है व्रत आपण सकाळी नित्य पूजन करून दहीभाताचा नैवेद्य आपल्या देवतांना दाखवून मगच हा व्रत सोडायचा आहे.

अशाप्रकारे सर्व स्त्रिया या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी तसेच सुखसमृद्धीसाठी हा वटपौर्णिमा व्रत मोठ्या श्रद्धेने करतात. म्हणून तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *