असे मिळतात शुभ संकेत रहस्य, जर असे घडले तर समजावे की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्व असते. कधी कधी वेळ कोणासाठी चांगली असते तर कोणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्यांच्यावर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला झुकावेच लागते.

तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंती कडून गरीबिकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही चालत नाही. काय परिस्थिती होती याची व आज कशी वेळ आली यांच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्यांचे जीवन, बालपण, तरुणपण, म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत.

जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते त्यांचे प्रौढ पण मजेत जाते. ज्यांचे बालपण आनंदात व मजेत गेलेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उतार काळ हा कष्टाचा जातो. याला काही अपवादही असतात.

पण ते क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते. प्रत्येकाला सुख दुःख पचवावेच लागते. प्रकृती तुम्हाला काही ना काही संकेत देत असते. ज्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनाचे संकेत मिळत राहतात.

जर आपण लक्ष दिले तर या इशाऱ्याने समजून घेऊन आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी जाणून घेऊ शकतो. या संकेतमुळे समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होते आहे याचा आता अंत आलेला आहे. दुःखांचा व कष्टांचा आता नाश होणार आहे.

एखादी गोष्ट म्हणजे किंवा एखादी वस्तू पटकन आपल्या समोर येऊन जाते. आपले त्या वस्तूकडे फारसे लक्षही नसते. बऱ्याचदा या वस्तू समोर दिसल्यामुळे काही काळात काहीतरी चांगले घडणार असते. त्याचे ते संकेत असतात. आता हा मानण्यातला भाग असला तरी पूर्वजांनी ते लिहून ठेवले त्यानुसार काही वस्तू काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ मानल्या जातात.

रस्त्यात पांढरी गाय दिसली खूप शुभ मानले हिंदू धर्मात गाईचा दर्जा दिलेला आहे. गाय आर्थिक सुदृढीकरणाचे प्रतीक आहे. त्यामुळे पांढरी गाय दिसली की साक्षात देवी लक्ष्मी चे दर्शन झाल्यासारखे समजले जाते.

सकाळी उठल्यावर नारळ म्हणजे श्रीफळचे दर्शन झाले तर गोड बातमी येणार आहे असे याचे संकेत असतात. कारण नारळाला भारतीय संस्कृतीत, कार्यक्रमात शुभ मानले जाते.

<
प्रवास करतानाही काही संकेत असतात पण ते लक्षात येत नाहीत. कधी कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा, साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो. सोनेरी साप दिसनेही शुभ असते. रात्री झोपताना पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर तो एक शुभ संकेत असल्याचे म्हटले जाते. काहीजणांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे.

हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कोणालाही आवडतो पण हाच निसर्ग स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरी ते शुभ मानले जाते. त्यातून हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानले जाते. घटनांचा आणि मनुष्याचा फार जवळचा संबंध असतो. हे वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असते.

यापैकी अनेक घटना जीवनात सुख घेऊन येतात तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात. आपण अनेक वेळा आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यातील अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत देतात.

या घटना कोणत्याही रुपात आपल्या समोर येऊ शकतात. पण वेळीच यांना ओळखणे महत्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ असतात. या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात.

चिमणीचे आपल्या घरात घरटे बनविणे – चिमणीचे आपल्या घरात घरटे बनविणे शुभ मानले जाते. जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधते तेथे आपल्या पिल्लांना जन्म देते. घरामध्ये आनंद येण्याचे संकेत आहेत. काही काळानंतर शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते. आणि घरापासून संकटे दूर राहतात.

त्यामुळे चिमणीचे आपल्या घरात घरटे बांधणे याचा चांगला संकेत मानला जातो. सकाळच्या वेळी मांजरीची पिल्लं दिसणे. सकाळी उठल्यावर खुश खबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो. तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीची पिल्ले दिसली तर हे त्याच्या आणि कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे. आपल्या सोबत असे घडले तर असे समजावे की चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे.

मुंग्यांचे समूह दिसणे मुंग्यांसारखी मेहनत कोणी करत नसेल त्याचबरोबर मुंग्यांना एकतेचे प्रतीक देखील मानले जाते. त्यांना अनेक वेळा समूहाने रांगेत चालताना पाहिलं असेल. जर आपल्या घरात काळ्या रंगाच्या मुंग्याचा समूह दिसला तर आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहेत.

या संकेताचा अर्थ आपल्या घरात लवकरच खुश खबर येणार आहे. आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे.

खिशातून नाणे खाली पडणे – कपडे घालताना खिशातून नाणे पडणे. हा एक शुभ संकेत आहे. धनलाभाची संधी मिळू शकते. यासाठी तयार राहावे. घरातील नारळ आपोआप तडकने – घरात एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की, घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतले आहे. यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही.

घरात आपोआप तुळस उगवणे – आपल्या घरातील बागेत आपोआप तुळस उगवली तर शुभ संकेत मानावा. घरामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे यामुळे समजते.

आपोआप दुर्वा उगवणे – घराच्या बागेत आपोआप दुर्वा उगवणे हे शुभ संकेत मानले गेलेले आहे. दुर्वा ज्या आपण श्री गणेशाना अर्पण करतो त्या उगवल्यास समजावे घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत.

घरामध्ये मध पडणे – मधाचे फुटून मध फरशीवर सांडल्यास समजावे की आता घरात negative एनर्जी राहिलेली नाही आहे. घरामध्ये आता मंगलकार्य होणार आहे. कधी कधी आपण सकाळी उठलो की खूप फ्रेश आणि उत्साही वाटते, आपल्याला अचानक खूप आनंदी असल्यासारखे वाटते.

किंवा आरश्यात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक, वेगळीच लाली पसरलेली दिसते. या गोष्टीचे संकेत आहे की चांगली वेळ आता सुरू होणार आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला सफलता मिळेल.

काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाहीत. पशु पक्षीही चांगल्या वेळेचे संकेत देतात. जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेचे संकेत देतात. आणि जर एखाद्या माकडाने आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होणार आहे. असा याचा अर्थ होतो. आणि घरात धन धान्याची भरभराटही येते.

जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिले तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामा निमित्त घराबाहेर पडलात व लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा भगवंताद्वारे चांगल्या वेळेची सुरुवात आहे.

जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाने भरलेले घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. ज्या कामाला हात टाकू ते नक्की पूर्ण होईल. आपल्याला सफलता मिळेल. हे आहेत चांगली वेळ येण्याचे संकेत.

तुमच्यासोबत असे घडत असेल तर तुम्हाला कोणतीही चिंता करण्याचे गरज नाही. कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारे देत आहेत. की तुमचे आता चांगलेच होईल. ज्यांच्या मागे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *