एक सुपारी इथे ठेवा, अपयश आपल्याला स्पर्श सुध्दा करणार नाही!!!

नमस्कार मित्रांनो,

आज आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत. की जो उपाय केल्याने आपल्या कोणत्याही मंगल कार्यात विघ्न येणार नाही. आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळेल. जसे कोणाला मुळे होण्यामध्ये अडथळे येत असतील. कोणाचा विवाह होण्यात अडचणी येत असतील. जर कोणी धार्मिक यात्रेला जाऊ इच्छित असेल. व त्यांच्या जाण्याच्या मार्गात वारंवार बाधा निर्माण होत असेल.

अथवा आपल्याला एखादी पूजा किंवा धार्मिक अनुष्ठान संपन्न करायचे असेल त्यामध्ये अडथळे येत असतील. अशा सर्व शुभ मंगल कार्य करण्यामध्ये आपल्याला सफलता मिळेल. आपल्याला धार्मिक यात्रेत अडचणी येत आहेत. घरातील मुलामुलींचे विवाह संदर्भात धावपळ करत आहात. पण काही ना काही कारणाने अपयश येत आहे. संतान सुखपासून वंचित आहात. वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत.

पती पत्नी, प्रेमी प्रेमिका यांच्या जीवनात काही चढ उतार चालू आहेत. वाद विवाद होत आहेत. तर हा उपाय करण्याने आपल्या सर्व कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊन तुम्हाला यश प्राप्त होईल. या उपायाने आपल्याला देवीच्या पूजेत, व्रतात सफलता प्राप्त होईल. तर आपल्याला या उपायासाठी काय करायचे आहे ते पाहूया. उपयासाठी आपल्याला एक छोटीशी सुपारी घ्यायची आहे.

मित्रानो पूजे मध्ये साधने मध्ये सुपारीचे योगदान खूप महत्वाचे असते. कोणत्याही धार्मिक पूजा विधी मध्ये आपण सुपारीचा वापर करतो. परंतु काही विशिष्ट अशा विधीने आपण सुपारीचा वापर केलात तर या सुपारीने आपल्याला प्रत्येक कामात यश येईल. आपण कोणतीही साधना करत असाल व्रत करत असाल. किंवा आपण एखाद खास काम करण्यासाठी जात असाल किंवा मीटिंग साठी जात असाल तर या कामात ही सुपारी आपल्याला नक्की यश मिळवून देईल.

या सुपारीच्या प्रभावाने शत्रूचा प्रभाव कमी होईल. नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होऊन जाईल. या शिवाय आपल्या घरातील वास्तू दोष संदर्भात आपल्याला काही समस्या असतील. या सुपारीने देखील आपल्याला लाभ मिळेल. किंवा आपण आपली प्रॉपर्टी किंवा घर, जमीन जुमला यांची विक्री करू पाहता आणि त्यात काही अडचणी येऊ शकतील तर आपण अनुभवाल की आपल्याला येणाऱ्या अडचणी संपून प्रॉपर्टी ची विक्री होत आहे.

ही सुपारी एकच आहे पण याचे फायदे अनेक आहेत. हा साधा असा उपाय आहे. हा उपाय कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीला किंवा बुधवारच्या दिवशी केला जाणारा उपाय आहे. हा उपाय करताना कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. आपण आपल्या कोणत्याही एका खोली मध्ये सैल ढिले कपडे घालून अगदी शांत होऊन बसायचे आहे.

जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्ची किंवा सोफ्यावर देखील बसू शकता. बसताना आपल्यासमोर एखादया तांब्याच्या प्लेटमध्ये किंवा वाटी मध्ये छोटीशी सुपारी ठेवावी. हा विधी करताना आपण निळ्या किंवा काळया रंगाचे कपडे घालू नयेत. इतर कोणत्याही रंगाचे चालतात. या नंतर शुक्री मुद्रा करायची आहे. शूक्री मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही गुडघ्यावर सरळ ठेवावे. आपले तळहात आकाशाच्या दिशे ला असतील यानंतर हाताची पाची बोटं एकत्र जुळवावी.

म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदका सारखा होईल. याला वराही मुद्रा असे देखील म्हणतात. आपण शुक्रि मुद्रा करून शांत बसायचे आहे. शांत बसल्यानंतर दहा वेळा प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा. व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा. आणि मग तो सावकाश हळु हळु सोडावा. यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध पिंच करायचे आहे. म्हणजे थोडे चिमटायचे आहे. अशा प्रकारे दहा वेळा श्वासो्छ्वास करावा.

<
असा करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते. आपल्या शरीरात एक चैतन्य निर्माण होते. व हे चैतन्य निर्माण झाल्यामुळे आपण जी विधी करणार आहोत. तो पूर्ण सफल होतो. प्राणायाम करून झाल्यानंतर ती सुपारी आपण आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यावी! आणि डावा हात, तसाच शुक्रीमुद्रेमध्ये ठेवायचा आहे.

व सुपारी उजव्या हाताच्या मुठी मध्ये ठेवून भगवान गणेशाच्या एका बीज मंत्राचा, आपण जप करायचा आहे. मंत्र आहे.. !! ग्लैं !! आपण याचा उच्चार मकार लावून करू शकता किंवा गकार लावून करू शकता. जर का आपण याला मकार लावला तर त्याचा उच्चार गलैव असा होईल. आणि गकार लावला त्याचा उच्चार गैग असा होईल. आपण आपल्याला हवा तसा याचा उच्चार करू शकता.

तर मित्रांनो आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी घेऊन, शुक्री मुद्रा करून बसावे. व या मंत्राचा उपांशु जप करायचा आहे. म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटत हा मंत्र जपायचा आहे. आपले फक्त ओठ हल्ले पाहिजे..! पण आवाज बाहेर येऊ नये! अशा रीतीने या मंत्राचा पाच मिनिटात जप करायचा आहे. जप पूर्ण झाल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीला एखादे फळ किंवा भोजन दान करावे. मित्रांनो हा विधी केल्यानंतर ही सुपारी साधारण सुपारी राहत नाही.

आपल्याला माहीत असेल की आपल्या भावना ज्यावस्तूमध्ये मन घालतो त्या वास्तूमध्ये पूर्ण त्या प्रभावित करत असतात. मग तो दगड का असू दे!! सजीव वस्तू मध्ये त्या भावना घालता येऊ शकतातच, पण निर्जीव वस्तू मध्ये देखील, या भावना घातल्या जाऊ शकतात. आणि म्हणूनच आपण आपल्या मंदिरातील देवतांच्या मूर्ती असतात त्या दगडाच्या असतात परंतु त्यांना प्राणप्रतिष्ठा करून जिवंत बनविल्या जातात. चैतन्यमय बनविल्या जातात. तर अशा पद्धतीने आपल्या भावना मंत्राच्या आधाराने यासुपारी मध्ये सामावल्या जातात. अशा पद्धतीने सुपारीमध्ये गलवण बीजं मंत्र म्हणत विधी केल्यानेही सुपारी आपल्या सर्व कार्यावर प्रभाव टाकनारी वस्तू बनते.

आपण कोणतेही कार्य करण्यासाठी जात असू त्यावेळी आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये ही सुपारी एखाद्या तांब्याच्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची आहे. वा या सुपारी वर थोडी हळद घालायची आहे. आणि यानंतर बीज मंत्रांचा जप करून, हात जोडून नमस्कार करावा व आपले काम करण्यासाठी निघून जावे. कोणतेही शुभ कार्य असो, विवाह संदर्भातील बोलणी करण्यासाठी जात असाल!

अगदी कोणतीही कार्य करण्यासाठी जात असाल, तर हा विधी करून आपण जावे. आपले काम निश्चितच पूर्ण होईल. आपल्या कामाला नक्की सफलता मिळेल. यानंतर पाच सहा महिन्यांनी जेव्हा ही सुपारी खराब व्हायला सुरू होईल, तेव्हा ही सुपारी पाण्यामध्ये प्रवाहीत करावी आणि पुन्हा कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी याच विधीने नवीन सुपारी बनवावी. तर मित्रांनो आपण हा उपाय अवश्य करून पाहा..! आपल्याला याचा फारच चांगला लाभ मिळेल. व आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यांमध्ये यश मिळेल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *