तुमच्या घरात जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा.

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा. कारण तुमच्या घरामध्ये धनधान्य वैभवाची कधीही कमतरता भासणार नाही. मित्रांनो आज मी तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवायची याबद्दल माहिती देणार आहोत.

तसेच देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास, अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास आपल्या घरात सुख समृद्धी नांदते. आपल्याला चांगले आरोग्य लाभते. घरात कधीच धन धान्याची कमतरता भासत नाही. बहुतांश लोकांच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते. पण त्यातील काही लोकांना ती मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवावी याबद्दल माहिती नसते किंवा कोणाला असते.

देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती फक्त अंथरलेल्या वस्त्रावर कधीच ठेवू नये. मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम तांब्याची किंवा पितळ्याची ताटली किंवा वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घालावेत. नंतर गहू किंवा तांदळावर हळद-कुंकू वाहावे आणि त्यावर श्री अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी.

जी अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची दैवत आहे म्हणूनच अन्नपूर्णा देवीची मूर्ती धान्यावर ठेवण्यास विशेष महत्व आहे. मित्रांनो अशा या देवघरामध्ये ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची दररोज यथासांग पूजाअर्चा केली पाहिजे.

शक्य झाल्यास दररोज किंवा दर आठवड्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती खाली असलेले धान्य बदललं पाहिजे. मित्रांनो जुन्या गहू किंवा तांदूळातील काही भाग हा आपल्या घरातील धान्यमध्ये मिक्स केला पाहिजे आणि काही भाग पक्ष्यांना खाण्यासाठी दिला पाहिजे.

तसेच अन्नपूर्णा देवीची उपासना करताना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील म्हंटल पाहिजे. मित्रांनो अशा प्रकारेही श्री अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास अन्नपूर्णा देवीची आपल्या घरावर अखंड कृपादृष्टी राहते व आपले कुटुंब सुखी व समाधानी राहते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *