नमस्कार मित्रांनो,
आपल्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे आपले स्वयंपाक घर त्याला किचन रूम अस म्हटलं जातं. आपण पाहणार आहोत स्वयंपाक घरामध्ये या वास्तु शास्त्रानुसार कोणकोणते गोष्टीची काळजी घ्यायला हवी.
जेणे करुन कुटुंबातील लोक आहेत, त्यांचे स्वास्थ्य चांगलं राहील. आणि त्यांचे प्रेमाचे संबंध टिकून राहतील. सर्वात पहिली गोष्ट जी आपल्या घरातील गॅस शेगडी असेल, चूल असेल, घरातील पाण्याचा साठा असेल.
हंडा असेल, माठ, फिल्टर असेल. यामध्ये जितक जास्त अंतर ठेवता येईल तितक ठेवायला हव. याचं कारण असं आहे की अग्नी आणि जल एकत्र येता कामा नयेत.
जर आपल्या गॅसच्या शेगडी जवळ एखादा पाण्याने भरलेला हंडा असेल तर त्यामुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो. पती-पत्नीमध्ये मोठ्याप्रमाणात वाद निर्माण होतात.
त्यामुळे लक्षात ठेवा अग्नीजवळ पाण्याचासाठा ठेऊ नका,गिजर, गॅस शेगडी जवळ असेल तर जास्तीत जास्त अंतर ठेवा. दुसरी गोष्ट आपल्या घरातील भांडी आहेत त्याचा कमीत कमी आवाज होईल असा प्रयत्न करा.
घरातील भांड्यांची आदळआपट आपटत चालू असते. जितका भांड्यांचा आवाज निर्माण होईल, जितकी भांडी कंप पावतील तितका घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल.
म्हणजेच या भांड्यांच्या आवाजातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करा नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही. तिसरी गोष्ट आपल्या घरामध्ये गृहिणी आहे.
तिने स्वयंपाक करताना आपलं जे तोंड आहे, ते पूर्व दिशेला कसा राहील याची काळजी घ्यावी. थोडक्यात घ्या आपली ची शेगडी आहे ती अशा दिशेला मांडून घ्यावी, तर आपलं तोंड पूर्वेकडे येईल.
<
मित्रांनो एखाद्या गृहिणी हिने आपले तोंड पूर्वेकडे करून स्वयंपाक केला तर एक प्रकारची स्वयंपाकात गोडी निर्माण होते. सुर्याचं तेज, ओज त्या स्वयंपाकामध्ये निर्माण होतो.
आणि म्हणून असा स्वयंपाक खाणाऱ्या व्यक्तीसुद्धा तेजवान बनतात, तेजस्वी बनतात. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. की पूर्व दिशेला तोंड करून जो व्यक्ती जेवतो, त्या व्यक्तीला बुद्धी आणि दीर्घायुष्याचा लाभ होतो.
ती व्यक्ती बुद्धिमान बनते, आणि तिचा आयुष्य सुद्धा वाढते. मित्रांनो अग्नि पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला आढळतो. शक्यतो जेवायला बसताना तुम्ही काहीही बोलू नका.
मौन बाळगा, कारण जेवण करताना जो व्यक्ती मौन बाळगतो. त्याच्या सर्व इंद्रियांना प्रसन्नता व मनःशांती लाभते. आणि जेवण करण्याचा हाच उद्देश असतो.
कारण पोट भरण्यासाठी जेवण नाहीये, तर आपली इंद्रिये तृप्त होण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी आणि मनःशांती लाभयला हवी. असं झालं तर आपण आपली दैनंदिन कार्य सुखासमाधानाने पार पाडू शकतो.
मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट स्वयंपाक घरामध्ये आपण सिरॅमिक स्टाईल जर लावणार असाल, तर त्या स्टाईल पूर्वेला व पश्चिमेला लावाव्यात.
दोन्ही बाजूला लावाव्यात, आणि लावताना त्या सौम्य रंगाचा असतील. यांची काळजी घ्यावी.या स्टाइल्स वरती ओम अन्नपूर्णा देवताय नमः असा मंत्र लिहू शकता.
मित्रांनो या मंत्राचा खूप मोठा महिमा आहे, ओम अन्नपूर्णा आय नमः हा मंत्र आपण जर हळदी कुंकू याने लिहिला तर त्या घरावरती अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त राहतो.
जी गृहिणी असते तिच्यावर अन्नपूर्णा देवीची कृपा राहते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये किती जरी पाहुणे आले, घरामधील सदस्य किती जरी वाढले. त्यामुळे घरातील अन्नपूर्णा देवीच्या कृपेमुळे अन्न कधीही संपत नाही.
हे अन्न कधीही कमी पडत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारची काळजी तुम्ही ही घ्या. तुम्हाला जाणवेल की अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त तुमच्यावरती आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.