नमस्कार मित्रांनो,
ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधील ग्रहांचे विश्लेषण करून त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामुद्रिकशास्त्रात मानवी शरीरावर असलेल्या अवयवांच्या रचनेच्या आधारे त्याचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य सांगितले जाते.
सामुद्रिक शास्त्र हे समुद्र ऋषींनी रचले होते म्हणून त्याला सामुद्रिक शास्त्र असे नाव पडले. आज आपण हाताच्या अंगठ्याबद्दल बोलणार आहोत. शरीराच्या विविध अवयवांप्रमाणेच हाताच्या अंगठ्याच्या आकारावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे ओळखता येईल, हेही सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे.
लहान अंगठा
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचा अंगठा लहान आणि जाड असतो, अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. हे लोक कोणावरही लवकर विश्वास ठेवत नाहीत. तसेच असे लोक भावनिकदृष्ट्या कमकुवत असतात.
हे लोक पटकन एखादी गोष्ट मनावर घेतात आणि मग त्याबद्दल विचार करत तासनतास घालवतात. पण हे लोक समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी लगेच स्वीकारतात.
बारीक अंगठा
जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचा अंगठा बारीक आणि लांब असेल तर अशी व्यक्ती खूप धैर्यवान असते आणि त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. परंतु अशी व्यक्ती संघर्ष करण्यास मागे हटत नाही आणि जीवनात लवकरच यश मिळवते.
त्याचबरोबर हे लोक मनी माइंडेड देखील असतात आणि हे लोक व्यवसायात मेहनत करून पैसे कमवतात. या लोकांचे छंदही महागात असतात आणि त्यांना लक्झरी लाइफ जगायला आवडते.
स्पष्टवक्ते लोक
सामुद्रिक शास्त्रानुसार जर तुमच्या हाताचा अंगठा खूप मागे वळला असेल तर असे लोक खूप दयाळू असल्याचं मानलं जातं. असे लोक खूप भावनिक असतात आणि त्यांच्यात खूप संस्कार असतात. त्याच बरोबर हे लोक स्पष्टवक्ते असतात. हे लोक काहीही मनात ठेवत नाहीत, जे काही बोलायचे ते तोंडावर बोलतात, असं म्हटलं जातं.
आनंदी लोक
सामुद्रिक शास्त्रामध्ये असं सांगितलंय की, ज्या लोकांच्या हाताच्या अंगठ्याचा मधला भाग जाड असतो आणि वरचा आणि खालचा भाग पातळ असतो, असे लोक खूप आनंदी असतात आणि त्यांचे वजन कालांतराने वाढत जाते.
तसेच, हे लोक जिथे जातात तिथे आनंदी-आनंद पसरवतात. जीवन एकदाच मिळालंय, त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे, असं या लोकांचं मत असतं.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.