अंगावर शहारा आणणारा….थरारक स्वामी अनुभव…

नमस्कार मित्रांनो,

ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ सर्व प्रेमळ स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. भक्तहो आज मी तुम्हाला असा एक जबरदस्त , भयानक अनुभव सांगणार आहे. की हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. डोळ्यात अश्रू देखील येतील.

आपले स्वामी आपल्या भक्तांच्या कसे पदोपदी सोबत असतात हे आजच्या या लेखात लक्षात येईल. स्वामी भक्तहो हा अनुभव मिरज येथील अनुप कुलकर्णी या दादांचा आहे. ते सांगतात २०१४ साल जस्ट b.com मध्ये प्रवेश घेतलेला होता. त्याच्या बाबांना cancer झाला. सुदैवाने आणि स्वामिकृपेने ते त्यातून वाचले.

या गोष्टीला एक वर्ष होत नाही तोपर्यंत त्यानं हार्ट अटॅक आला. तो एवढा जोरदार होता की त्यांना ताबडतोब ४२,०००रू. चे इंजेक्शन द्यावे लागले. त्यातूनही ते बाहेर आले पण डिस्चार्ज देताना दहा पावलं पण चालता येत नव्हते. मग डॉक्टरांनी अंजोग्राफी करण्याचा सल्ला दिला. अंजोग्रफी केली तर त्यात १००टक्के blokages दाखवले.त्यानंतर आम्ही KME बेळगाव येथे घेऊन जायचे ठरले.

मी खूप लहान व दोन दोन बहिणी होतो.कुणीही पाहुणे सोबत नव्हते व खूप भीती घातली.हॉस्पिटल असा आहे तस आहे. खूप पैसे लागतात असं. मी २०,०००रू घेऊन बेळगावला गेलो. रेल्वे मध्ये बसलो आणि स्वामींना म्हणालो तुम्ही पाठीशी असाल तर ऑपरेशन होऊ देऊ नका आणि गेलो. डॉक्टर माधव दीक्षित म्हणून डॉक्टर होते. त्यांची भेट दुर्मिळ पण ओळखिमुळे भेट झाली.

ऑपरेशन करायचं ठरलं. खर्च सांगितला पैसे भरले. मिरज मधून मित्रांना घेऊन ब्लड दिलं. आणि मला भीती वाटत होती म्हणून मी भावोजिना थांबवून मिरजेला आलो. दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झाली. बाबांना आत ऑपरेशनला घेतलं. सर्व मशीन लावले. आणि डॉक्टरांनी अंजोग्रॅफी केलेली सीडी पहिली व त्यांनी ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला.

आम्ही आमच्या रिस्कवर करण्यास बोललो. पण डॉक्टर म्हणाले मी ४० वर्षाचा अनुभव सांगतोय की मी या माणसाला फाडल तर माणूस जागेवर मारणार आहे. मी हसत खेळत माणसाला मारणार नाही. तरी आम्ही रिस्क घ्या बोललो. पण डॉक्टरांनी नकारच दिला नंतर मला माझ्या भावोजिंचा फोन आला असं असं झालं आहे. म्हणून मी रडायला लागलो. पैसे नसताना पैसे भरून कसं कॅन्सल झालं.

मग स्वामिंसमोर रडू लागलो. तुम्हीच केलं का म्हणू लागलो. तेव्हढ्यात स्वामिफोटोवरून फुल पडलं. आणि सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर बाबांनी सहा महिने औषध घेतलं असेल. नंतर बाबांनी एकही कोणती गोळी घेतली नाही व दोन किलोमीटर रोज चालणं होत.

पण स्वामी आशीर्वाद पाठीशी त्यामुळे सहा वर्ष अगदी ठणठणीत आहेत. रोज काम करतात स्वामी सेवा करतात. हम गया नही अभी जिंदा है. याचा खूप मोठा अनुभव आला.प्रचीती आली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.