नमस्कार मित्रांनो,
नवरात्र उत्सव चालू आहे. प्रत्येकाच्या घरी घटस्थापना केलेली आहे. घटस्थापना करताना आपण दिवा प्रज्वलित करतो. हा दिवा नऊ दिवस अखंड तेवत असतो आणि त्याद्वारे आपली पूजा देवी आई पर्यंत पोहोचते.
हा दिवा विझू नये. अखंड तेवत राहावा यासाठी आपण खूप काळजी घेतो. परंतु एखाद्या वेळी चुकून असे काही घडते दिवा विझतो आणि आपण त्याबद्दल विचार करू लागतो.
असे का झाले असेल? माझ्या हातून काही चूक झाली असेल का? देवी आई माझ्यावर रागवली तर नसेल? नवरात्रीला आपल्या हातून असे काही कार्य झाले असेल जे देवीला आवडलं नसेल तर दिव्याच्या मार्गे देवी माता आपल्याला संकेत देत असते.
कधीकधी आपण पूजा करत असताना अचानक दिवा विझतो. तेव्हा आपण घाबरतो की हा अपशकुन आहे. म्हणून आता काहीतरी अघटित घडणार. परंतु घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण देवी आपल्या भक्तांवर कधीच कोपत नाही. ती दयाळू आहे.
आपल्या द्वारे झालेली चूक फक्त आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून जर अखंड ज्योत विझली. तर आधी आपल्या अंगावर गंगेचे पाणी शिंपडावे व माग पूजेच्या ठिकाणीसुद्धा गंगेचे पाणी शिंपडावे.
त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरात दिवा लावावा. नंतर नवीन वात घेऊन घटा जवळील दिव्यात टाकून तो दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर त्यातील जुनी वात बाहेर काढावी.
जोपर्यंत नवीन वात प्रज्वलित होत नाही तोपर्यंत दिव्यातील जुनी वात काढू नये. ती तशीच ठेवावी. नंतर ती जुनी वात पाण्याच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्यावी. नंतर देवीच्या पाया पडून आपल्याकडून नकळत झालेल्या चुकीची माफी मागावी.
असे केल्याने देवीची कृपा दृष्टी तुमच्यावर होईल व तुमच्या हातून जी चूक झाली असेल त्याबद्दल देवी आई तुम्हाला माफ करेल. घरात घट बसवलेले असताना जर स्त्रीला मासिक धर्म आला तर तिला आता काय करावे हे समजत नाही.
परंतु मासिक धर्म ही एक नैसर्गिक क्रिया असल्यामुळे त्यात आपला काहीही दोष नाही. म्हणून हे चार दिवस घरातील इतर व्यक्ती कडून देवीचे पूजन करून घ्यावे. घरात जे कोणी असतील त्यांच्या हाताने व्यवस्थित पूजन करून घ्यावे. यामुळे तुमच्या पूजेत खंड पडणार नाही.
आपण घटाची स्थापना करतो त्यावर नारळ ठेवलेला असतो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपण तोच नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना देतो परंतु एखाद्या वेळी तो नारळ खराब निघतो. अशावेळी आपल्याला वाटते की देवी आपल्यावर नाराज झाली आहे.म्हणून हे नारळ खराब निघाले.
परंतु खरेतर देवीने संपूर्ण नारळ स्वीकारलेले असते म्हणून ते खराब निघते. याद्वारे असा संकेत मिळतो कि देवी आईचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत व आता सर्व काही चांगले होणार आहे.
आपण जे धान्य घटाबरोबर पेरतो ते जितके दाट व हिरवेगार असेल इतकी आपली भरभराट होणार आहे असा याचा अर्थ होतो. त्यामुळे त्याला सकाळी पूजेचे आधी पाणी अर्पण करावे.
आरती करताना कापूर जरूर लावावा व ही ज्योत संपूर्ण घरात फिरवावी. म्हणजे कापुराच्या सुगंधाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते.
कशाप्रकारे देवी आईचे पूजन करा व आईचे आशीर्वाद मिळवत रहा. धन्यवाद.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.