आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर ही एक गोष्ट आजच सोडा.

नमस्कार मित्रांनो,

असे म्हणतात की जगातील ९० टक्के संपत्ती जगातील फक्त १० टक्के लोकांकडे आहे. आणि १० टक्के संपत्ती संपत्ती ९० टक्के लोकांकडे आहे. अस का आहे ? जगातील फक्त १० टक्के लोक श्रीमंत आणि यशस्वी आहेत. आणि बाकीच्या लोकांची आयुष्य जगण्यासाठी धडपड चालू आहे. तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे. याचे तुम्हाला मर्म कळाले तर आयुष्यात कमालीचा बदल होऊ शकतो.

एक साधू आपल्या शिष्या बरोबर चाललेला असतो. त्यांना एक गाव लागतं. खूप दुपार झाल्याने सूर्य डोक्यावर आलेला असतो. त्यांना खूप तहान लागलेली असते. ते एका शेतात येतात. शेत खूप चांगली असतात. पण त्याच्यात काही धन धान्य लावलेलं नव्हतं. बरेच वर्ष ती अशीच पडून होती. शेताच्या मधोमध त्यांना एक घर दिसलं. ते जावून दाराचा दरवाजा वाजवतात. एक माणूस दरवाजा वाजवतो.

ते म्हणतात आम्हाला खूप तहान लागली आहे. पाणी मिळेल का ? तो माणूस त्यांना पाणी आणून देतो. तेवढ्यात त्या माणसाची दोन मुलं आणि बायको येते. त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या अंगावर फाटके तुटके कपडे असतात. तो साधू त्या माणसाला विचारतो शेतात तर काही उगवले नाही तर घर कसे चालते. तो माणूस म्हणतो शेत तर माझेच आहे पण आमच्याकडे म्हैस आहे.

ती दूध देते त्या दुधाची विक्री आम्ही करतो. आणि कसबस घर चालवतो. अशा गप्पा मारता मारता संध्याकाळ होते. तो साधू आणि त्याचे शिष्य तिथेच राहतात. मध्यरात्री साधू आपल्या शिष्याला उठवतो. आणि म्हणतो आपल्याला लगेच निघायचे आहे. तो त्याच्या शिष्याला म्हणतो, ही जी म्हैस बांधलेली आहे तिला पण सोबत घे.

शिष्याला काही कळत नाही पण गुरू आज्ञा मानून तो त्या म्हैशीलापण बरोबर घेऊन तो निघतो. आणि शेकडो मैल गेल्यावर त्यांना एक जंगल लागते. साधू आपल्या शिष्याला सांगतो. म्हैशीला इथेच सोडून दे. शिष्याला काही कळत नाही. कारण ज्या माणसाचे घर मुल बाळ ज्या म्हैशीवर चालले होते ती म्हैस आता जा जंगलात जाणार होती. परत गुरू आज्ञा मानून तो म्हैशी ला जंगलात सोडून देतो.

या गोष्टीला दहा वर्षे उलटून जातात. तो शिष्य साधू कडून शिक्षा घेऊन खूप मोठा होतो. प्रगती करतो पण त्याच्या मनात एक खदखद कायम असते. की आपण एका माणसाचा संसार उद्ध्वस्त केला. मग तो प्रायश्चित्त करण्यासाठी आपली गाडी घेऊन त्या माणसाच्या गावात येतो. गावात आल्यावर जिथे ते राहिले होते तिथे त्याला खूप वेगवेगळ्या फळांची झाडे दिसतात, त्याला वाटते.

म्हैस गेल्यामुळे त्या माणसाने जमीन दुसऱ्याला विकली असेल. असा विचार करून तो तिथून जायला लागतो. तेवढ्यात त्याला तोच माणूस दिसतो. तो त्याला जावून भेटतो. मला ओळखलं का? दहा वर्षापूर्वी माझ्या गुरू बरोबर राहायला आलो होतो. कसं विसरेन मी ती रात्र. तुम्ही त्या रात्री न सांगताच निघून गेलात. आणि नेमके त्याचं रात्री या गावात चोर आले होते. जे आमच्या म्हैशीला सुद्धा चोरून घेऊन गेले.

म्हैस चोरीला गेल्यावर आमच्या घरच्यांचे खूप हाल झाले. पहले काही दिवस मला कळलेच नाही काय करावे? दुःखात दिवस गेले. काय पर्याय नव्हता. मेहनत करायला सुरुवात केली. लाकड तोडून विकायला सुरुवात केली. थोडे पैसे यायला लागले. त्या पैशाने शेतात धन धान्य लावले. खूप चांगले पीक आले. चांगले पैसे मिळाले. त्या पैशात वेगवेगळ्या फळांची झाडे लावली. झाडे चांगली फळे देवू लागली.

<
अजून झाडे लावली. आता मी जिल्ह्यातला एक नंबरचा फळांचा व्यापारी आहे. मी खूप श्रीमंत झालो आहे. तो शिष्य विचारतो. हे तुम्ही आधी पण करू शकला असता. आधी म्हैस असल्यामुळे मी पांगळा झालो होतो. मला वाटतं होते सर्व काही ठीक चालू आहे. पण म्हैस चोरीला गेल्यावर काही पर्याय नव्हता. नाहीतर दोन वेळ जेवण सुद्धा मिळाले नसते आम्हाला.

त्यामुळे खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळं आज मला भेटले आहे. मी त्या चोरांचा आभार मानतो की त्यांनी माझी म्हैस चोरली. नाहीतर मी आज सुद्धा तेच दरिद्री जीवन जगत असतो. मित्रानो ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते. की आपल्या पण आयुष्यात अशी कोणती म्हैस नाही ना? जिच्यावर आपण विसंबून असतो. जो आपल्याला प्रगती करून देत नाही. अशी म्हैस असेल तर आताच वेळ आली आहे.

आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकण्याची, काही तरी करायची. आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल तर चौकटीच्या बाहेर जाऊन गोष्टी करायला लागतील. तुम्ही म्हणाल हे बोलायला खूप सोपं आहे. हो तुमचं बरोबर आहे. पण तुम्हाला असामान्य व्हायचं असेल तर करावच लागेल नाहीतर सामान्य जीवन जगण्यासाठी तयार रहा. महेंद्रसिंह धोनी ने टीसी चा जॉब सोडला नसता तर आज भारतीय क्रिकेट ला सर्वोत्तम कर्णधार भेटला नसता.

नरेंद्र मोदी लहानपणी जर चहा विकत राहिले असते तर ते देशाचे पंतप्रधान झाले नसते. धीरूभाई अंबानी नी पेट्रोल पंप वरची नोकरी सोडली नसती तर आपल्याला रिलायन्स चे साम्राज्य दिसले नसते. अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यांनी आपले कम्फर्ट झोन च्या बाहेर जाऊन अनेक गोष्टी केल्या आहेत. आणि यशस्वी झालेत. असे नाही की त्यांना अपयश नाही आले. पण प्रत्येक अपयशाचा सामना करत ते पुढे चालत राहिले. धैर्याने सामना केला. तुम्हाला पण आयुष्यात मोठे करायचे असेल तर कम्फर्ट झोनच्या बाहेर यावे लागेल. जबरदस्त मेहनत करावी लागेल. मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवु शकत नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *