नमस्कार मित्रांनो,
वासुदेव हरी, पांडुरंग हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
मित्रांनो आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी होय. याशिवाय प्रत्येक महिन्यात किमान दोन एकादशी असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात.
मित्रांनो हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तसेच देशाच्या इतर ठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपूरला येत असतात. यालाच आषाढी वारी असेही म्हणतात.
लाखो भाविक पूर्ण श्रद्धेने चंद्रभागेत आंघोळ करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी वारी या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराज यांचीची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, पालखी प्रस्थान होत असते.
सर्व संतांच्या पालखी सोहळ्यामुळे या आषाढी एकादशीचे खूप महत्व आहे. कारण पंढरपूरचा विठू राया महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. म्हणून या दिवशी केलेल्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे सांगितले जाते. आणि म्हणूनच या एकादशीला खूप महत्व आहे.
मित्रांनो हिंदू शास्त्रांमध्ये या दिवशी करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. त्यातलाच पहिला उपाय म्हणजे एकादशीला श्रीहरी विष्णू यांना केशर घातलेल्या दुधाने अभिषेक केल्याने आपल्या मनातील सर्व अपूर्ण इच्छा भगवान विष्णू पूर्ण करत असतात.
या एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठून स्ना न करून गायत्री मंत्राचा जाप केल्याने माता देवी लक्ष्मीसह विष्णू देवाची कृपादृष्टी आपल्यावर होत असते.
या एकादशीच्या दिवशी विष्णू भगवंतांच्या मंदिरात खीर किंवा पांढरी मिठाई प्रसाद म्हणून ठेवावा. यामुळे आपल्या पैशांमध्ये बरकत येते. पण हा नैवेद्द अर्पण करत असताना त्यात तुळशीची काही पाने ठेवून मगच नैवेद्य अर्पण करावा. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात.
मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील काही कामात सतत अडचणी येत असल्यास, काही अडथळे जर कामात येत असतील तर, या एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू यांना एक नारळ आणि बदाम अर्पण केल्यास आपल्या कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. परिणामी आपली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील.
मित्रांनो याशिवाय एकादशीच्या दिवशी पिवळी वस्त्र धारण करून पिवळी फळे, पिवळे फुल आणि पिवळी वस्त्र भगवान विष्णूना अर्पण करून, गरजू व्यक्तींना वाटाव्यात. यामुळे श्रीहरी विष्णू ची कृपा होते.
एकादशीच्या दिवशी संध्याकाळी माता तुळशीसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून ‘ओम वासुदेवाय नमः” या पवित्र मंत्राचा उच्चार करत माता तुळशीला 11 प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. यामुळे आपल्या घरात सुख व शांतता राहते तसेच येणाऱ्या संकटांपासून आपले संरक्षण होत असते.
मित्रांनो यासह आपल्या घरात दक्षिणावर्ती शंख असल्यास, त्यामध्ये पाणी भरून त्या पाण्याने एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी अभिषेक केल्याने आपल्याला धनवृद्धी होते. त्यामुळे आपण या एकादशीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर यापैकी कोणताही एक उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फलप्राप्ती होईल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.