नमस्कार मित्रांनो,
पूर्वजन्मातील कर्मानुसार आपल्याला या जन्मात आपले आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी मित्र शत्रू सघेसंबंधी, नातेवाईक मिळत असतात असं म्हटलं जातं. कारण या सगळ्यांशी आपल्या मागच्या जन्माच काहीतरी देणं घेणं असतंच असतं.
आता आपण बघूया की, आपल्या मुलाबाळांच्या रूपात आपल्या पोटी कोण जन्म घेत असतात? ज्याला शास्त्रामध्ये चार प्रकारे सांगितले गेले आहे. पहिलं म्हणजे ऋणानुबंध – मागील जन्मातील असा कोणी जीव ज्याच्याकडून आपण मागच्या जन्मी ऋण घेतलं असेल किंवा ज्याचं धन आपण नष्ट केलेल असेल असा जीव आपल्या घरात आपलं अपत्य म्हणून जन्म घेण्याची दाट शक्यता असते.
मित्रांनो मुलांच्या पालन-पोषणावर आपण भरपूर खर्च करतो आणि त्या पैशांचा हिशोबही कधी ठेवत नाही. बऱ्याचदा पैसा हा मुलांच्या एखाद्या गंभीर आजारावर किंवा त्यांच्या चैनीवर सुद्धा खर्च हिट राहतो. जोपर्यंत त्या जिवाचा संपूर्ण हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहतं.
दुसरा म्हणजे पूर्व शत्रू – मागील जन्मातील आपला एखादा शत्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात सन्तान म्हणून जन्म घेतो आणि मोठा झाल्यावर बऱ्याचदा आपण समाजात बघतो की, काही मुलांचे आपल्या आईवडिलांशी अजिबात पटत नाही.
काही जण तर इतके दुष्ट प्रवृत्तीचे असतात की, आई-वडिलांना मारझोड करायलाही मागेपुढे पाहत नाही. सतत भांडण तंटे होतात किंवा त्यांना त्रास दिला जातो संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रासच देणारी काही अपत्य आपण समाजात बघतो. नेहमी वाईट साईट बोलून त्यांना दुखी सुद्धा केलं जातं अपमानित केले जात.
मित्रांनो काही मुले आपल्या आईवडिलांशी इतकं वाईट वागतात की शत्रू सुद्धा इतका वाईट त्यांच्याशी कधीही वागणार नाही आणि मग कुठल्या जन्माचा सूड उगवतोय कोण जाणे असे म्हणायची वेळ येते हाच तो प्रकार.
तिसरा म्हणजे उदासीनता पुत्र – या प्रकारचे अपत्य आपल्या आई-वडिलांची सेवाही करत नाही आणि त्यांना त्रासही देत नाहीत. त्यांना त्यांच्या आहे त्या परिस्थितीत तसच राहू देतील. एकदा का विवाह झाला की अशी मुले आपल्या आई वडिलांपासून वेगळ राहणे पसंत करतात.
चौथा प्रकार म्हणजे सेवकपुत्र – मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जीव त्याच्यावरील सेवेच ऋण फेडण्यासाठी या जन्मात आपलं अपत्य म्हणून जन्म घेतो आणि आई-वडिलांच्या सेवेमध्ये आपलं जीवन घालवतो. आपण जे पेरलं असेल तेच उगवणार आहे ना.
मग समाजात आपण बघतो की, अरे काय श्रावण बाळासारखा मुलगा आहे असं सहज म्हटलं जातं .कारण की, हे त्यांचं कुठल्या ना कुठल्यातरी जन्माच पुण्यकर्म असत. आपण जर आपल्या आई-वडिलांची सेवा केली तरच म्हातारपणी आपली ही मुलं आपली सेवा करतील नाही तर कोणी पाणी देणार सुध्दा भेटत नाही असं म्हटलं जात.
मित्रांनो असं नाही की, या सर्व गोष्टी मनुष्यप्राण्यावरच लागू होतात. या चार प्रकारांमध्ये कोणताही जीव असू शकतो. जर आपण एखाद्या निरपराध जीवाला त्रास दिला असेल तर असा जीव सुद्धा आपल्या जीवनात आपला शत्रू बनून येऊ शकतो आणि त्याचा बदला घेऊ शकतो.
म्हणूनच जीवनात कधीही कोणाचे वाईट करू नये. कारण की, निसर्गाचा हा नियमच आहे की, जे कर्म आपण करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढच्या कुठल्यातरी एका जन्मामध्ये शंभर पटीने करावीच लागते. म्हणूनच आचरण शुद्ध असावे आणि कर्म ही सात्विक असावे असं म्हंटलं जातं.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.