नमस्कार मित्रांनो,
तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचा प्रभावी मंत्र आपल्याला माहीत आहे. श्री स्वामी समर्थ या नामात किती शक्ती आहे. आपण नेहमी सतत या नामाचे नामस्मरण करत असतो आणि यामुळे आपल्या भरपूर समस्या दूर होतात परंतु स्वामींनी आपल्याला प्रभावशाली मंत्र दिला आहे.
हा मंत्र कोणत्याही समस्येवर, संकटांवर कारगर असतो. जर तुमच्या घरात सतत कोणी आजारी असेल किंवा घरात कोणत्या समस्या असतील.
व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल. घरात वादविवाद होत असतील. कोणत्याही समस्या असतील तर हा मंत्र बोलायला सुरुवात करा.
हा मंत्र आहे तारक मंत्र.
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
बरेचजण हा मंत्र म्हणत असतील. आपल्या घरातील समस्या दूर होतील. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजा अने त्रासलेले आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे. त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी करतातच स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे.
तारक मंत्र देऊन. तारकमंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. ती स्वामींची अगम्य शक्ती आहे.
<
हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते की नाही आणि हा जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते.
हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडव आहे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त स्वामींच्या वाचनावर आणि स्वमिंवर विश्वास ठेवा.
मग बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असूद्या ती या मंत्राने दूर होईल. तुम्हीही या मंत्राची शक्ती अनुभवा. मित्रांनो जेव्हाही तुम्ही तारक मंत्र बोलायला सुरुवात कराल त्याच्या आधी एक अगरबत्ती लावावीआणि एका वातीमध्ये किंवा ग्लास मध्ये पाणी ठेवावे.
एक वेळेस तारक मंत्र बोलवा. मंत्र बोलून झाल्यावर श्री स्वामी समर्थ या नामाची एक माळ करावी आणि त्यानंतर अगरबत्तीचा रक्षा सगळ्या घरातील सदस्यांना लावावी आणि ठेवलेले पाणी सगळ्या सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे.
असे न चुकता रोज करावे सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्यावी आणि तारक मंत्र म्हणावा. तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि घरात शांती, सुख, समाधान लाभेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.