नमस्कार मित्रांनो,
मेष रास -चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा भावना आणि व्यवहार अर्थात मन आणि बुद्धी यांच्यात समतोल राखणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाची बाजू वरिष्ठांपुढे प्रभावीपणे मांडाल.
जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्या कलात्मकतेला वाव मिळेल. मुलांवर केलेले संस्कार कामी येतील. त्यांच्यातील समाजकार्याची आवड दिसून येईल. श्वास लागणे, धाप लागणे असे त्रास आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत.
वृषभ रास – चंद्र-नेपच्यूनचा युतीयोग हा उत्साहवर्धक आहे. नव्या संकल्पनांना पूरक वातावरण मिळेल. सकारात्मक विचारांनी इतरांना धीर द्याल. गरजवंतांना दिशा दाखवाल. नोकरी व्यवसायात प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल.
सहकारीवर्गाला सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक वातावरण शिस्तीचे पण प्रेमाचे राहील. मुलांसाठी केलेले आर्थिक नियोजन कामी येईल. उत्सर्जन संस्थेसबंधित त्रास, जळजळ होणे अशा समस्या उदभवतील. काळजी घ्यावी.
मिथुन रास – बुध-नेपच्यूनचा नवपंचम योग हा बुद्धिमत्तेला अंत:स्फूर्तीची जोड देणारा योग आहे. नवनिर्मितीसाठी पूरक ग्रहमान आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात साकल्याने विचार करून योग्य निर्णय घ्याल. सहकारीवर्गाच्या समस्या समजून घ्याव्यात.
जोडीदाराचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. मुलांच्या बाबतीत शुभ वार्ता समजतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी लांबणीवर पडतील. उष्णतेच्या विकारांवर वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत.
सिंह रास – गुरू-मंगळाचा समसप्तम योग उदात्त विचारांना प्रत्यक्षात आणणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात मंगळाची ऊर्जा आणि गुरूचे ज्ञान यांचा उत्तम संगम दिसून येईल. सहकारीवर्गाला समाजकार्यासाठी उद्युक्त कराल.
वडीलधाऱ्या आदरणीय व्यक्तींकडून मोलाचा सल्ला मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मुलांच्या कामाला गती मिळेल. लहान-मोठय़ा प्रवासात पडणे, मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.