16 एप्रिल हनुमान जयंती याठिकाणी दिवा लावा.. सुख समृद्धी, यश, कीर्ती वाढेल

नमस्कार मित्रांनो,

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतात. यावर्षी शनिवारी 16 एप्रिलला हनुमान जयंती आली आहे आणि शनिवार हा हनुमानाचा मानाचा दिवस असतो. त्यामुळे ही जयंती अतिशय शुभ आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे आपल्या घरामध्ये सूख, संपदा व भरभराट येते.

या दिवशी लाल रंगाच्या कापडाला कुंकवाचा लेप लावावा आणि ते हनुमानाला अर्पण करायचे आहे. असे केलं तर आपल्या जीवनामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा, जे काही वाईट गोष्टी असतील ते निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात हनुमान जयंतीच्या दिवशी आणखी काही करायचे उपाय.

हनुमान जयंतीच्या दिवशी तुपातली पाच पोळ्या करायच्या आणि त्याचा नैवद्य दाखवायचा. हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपल्याला जर शत्रू पिढा असेल तर त्यापासू न आपली सुटका होते.

आपल्या व्यवसायात भरभराट व्हायची असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमनाला लाल रंगाचा लंगोट अर्पण करावा आणि त्यांचे मनोभावे दर्शन करावे. तसेच केसरी रंगाचा छोला अर्पण करावा आणि बंदीच्या लाडूचा प्रसाद ही अर्पण करावा.

आपल्याला काही पीढा किंवा बाधा असेल तर आपल्या डोक्यावरून आठ वेळा नारळ उतरून हनुमानाच्या मंदिरात अर्पण करावा. हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जात असताना हनुमानाचा जप करीत जावे.मंदिरात बसून अकरा वेळा हनुमान चालीसाचा पाठ करावा.

त्यापूर्वी तीळाच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकून दिवा लावावा आणि हनुमानाला गुलाबाच्या फुलाचा हार घालावा. त्या नंतर एका नारळावर स्वस्तिक काढून तो नारळ हनुमान मंदीरात अर्पण करावा.यामुळे आपल्या वर काही समस्या असतील तर त्या दूर होतात.

जर आपल्याला पैशाची आर्थिक अडचण असेल तर पिंपळाच्या झाडाची अकरा पाने घेऊन ती स्वच्छ धुऊन त्या प्रत्येक पानावर श्री राम लिहावे आणि ते अर्पण करायचे. हनुमान जयंतीच्या दिवशी एक विडा तयार करून तो मंदिरात अर्पण करावा. हनुमान जयंतीच्या दिवशी मनात कोणते ही वाईट विचार आणू नयेत.

तर मित्रांनो तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपाय हनुमान यांच्या जयंती दिवशी जर केले तर तुमचे सर्व दुःखे, काही अडचणी असतील तर त्या सर्व निघून जातील व तुमचे जीवन आनंदमय होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *