नमस्कार मित्रांनो,
दर मंगळवारी स्वामींच्या सेवेमध्ये हे एक काम करा, स्वामी लवकर प्रसन्न होतील. आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो आपण दररोज स्वामींची सेवा करतो. मनोभावे पूजा अर्चना करतो. नाम जप करतो.
आपण खूप काही करतो. दिवसभर स्वामी स्वामी करतो. आपला प्रयत्न असतो की स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावे. आपल्यालाही अनुभव यावेत आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या.
मित्रांनो स्वामी कृपेसाठी आपण अनेक उपाय करतो, अनेक प्रकारच्या सेवा करतो, नामजप करतो. पण कधीकधी आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. परंतु मित्रांनो आजच्या या माहितीमध्ये छोटासा उपाय आपण जाणून घेणार आहोत.
एक छोटेसे काम आहे, जे तुम्हाला फक्त दर मंगळवारी करायचे आहे आणि आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी हे काम आपल्याला करायचे आहे.
घरातील महिलांनी केले तर हे घरासाठी अत्यंत शुभ असेल. आत्ता हे काम काय असेल तर, मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरा मध्ये सकाळी जेव्हा कधी देवपूजा कराल, तेव्हा देव पूजा करताना एक छोटीशी धूप जाळायची आहे.
धूप असू द्या किंवा लो बा न असू द्या. तुम्हाला एखाद्या प्लेट किंवा वाटीमध्ये हे धूप किंवा लो बा न जाळायचे आहे. त्यानंतर संपूर्ण घरात ते धूप फिरवायचे आहे.
घरभर फिरवल्यानंतर तो धूर सगळ्या घरामध्ये, कानाकोपऱ्यात पसरला जाईल. यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती नाहीशी होईल. रोगरा ई घरात येणार नाही.
चांगल्या ऊर्जेचा संचार घरात होईल, घरात प्रसन्न वाटेल, सुख-समृद्धी प्राप्त होईल, आ जार पण घरात येणार नाही आणि तुम्हाला एक नवीन सकारात्मक ऊर्जा घरात जाणवेल.
सगळ्यांचे मन प्रसन्न राहील, घरात वाद-वि वाद, कटक ट होणार नाही. मात्र येथे एक गोष्ट म्हणजे, नियम पाळायचा आहे तो म्हणजे हे तुम्हाला दर मंगळवारी करायचे आहे. असे नाही की एक मंगळवार केला आणि झालं.
फक्त एक मंगळवार नाही तर दर मंगळवारी आपल्याला सकाळी हा एक छोटासा उपाय, हे छोटेसे काम करायचे आहे. तर फक्त धूप जाळायचे आहे आणि ते संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत फिरवायचे आहेत. जेणेकरून घरातील प्रत्येक कोपरा हा त्या धुराने शुद्ध होईल.
दर मंगळवारी एक एक छोटा उपाय अवश्य करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.