नमस्कार मित्रांनो,
दरवर्षी माघ पक्षातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीस गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी आपण श्री गणेशाची मनोभावे पूजा करा व्रत करा. भगवान गणेशांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्यांना अर्पण करा. गणपती बाप्पा यामुळे खूप लवकर प्रसन्न होतात. आपल्या जीवनातील अडचणी समस्या दूर करतात.
काही संकटे आहेत मोठी बाधा आहे त्यातूनसुद्धा आपल्या भक्तांना सही सलामत बाहेर काढतात. गणपती बाप्पा हे शुभता, समृद्धी, सौभाग्य, सफलता प्रदान करणारी देवता आहे. मित्रानो जाणून घेऊया की या गणेश जयंतीस आपण गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कोणकोणते छोटे छोटे उपाय करू शकता.
गणेश जयंतीस गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून मोदक नक्की अर्पण करा. गणपती बाप्पांना मोदक अत्याधिक प्रिय आहेत. जी व्यक्ती गणपती बाप्पांना मोदक अर्पण करते तिच्यावर गणपती बाप्पा खूप लवकर प्रसन्न होतात. तिच्या मनातील इच्छांची पूर्तता करतात.
मित्रानो मोदक सोबतच आपण भगवान श्री गणेशाना २१ दुर्वा सुद्धा अर्पण करा. २१ दुर्वा जेव्हा गणपती बाप्पांच्या पोटामध्ये आग पडली होती तेव्हा त्यांच्या मातेने म्हणजेच पार्वतीने त्यांना दुर्वा दिल्या होत्या. आणि म्हणूनच त्यांना दुर्वा अत्याधिक प्रिय आहेत. जी व्यक्ती श्री गणेशाना २१ दुर्वा अर्पण करते गणपती बाप्पा त्या व्यक्तीच्या जीवनातून संकटे आणि अडचणी काढून टाकतात.
मित्रानो गणेश जयंतीला आपण गणेश चालीसाचा जर पाठ केलात आणि भगवान गणेशांची जर आरती ओवळली तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन अशा व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य निर्माण करतात. जर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर मोठ संकट आलेलं आहे किंवा काहीतरी संकट येणार आहे ज्यातून खूप मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे.
या संकटातून मुक्ती मिळण्यासाठी या गणेश जयंतीला आपण गणेश कवचाचा पाठ करा. गणेश जयंतीला गणेश कवचाचा पाठ केल्यास मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. ज्या प्रमाणे आपण देवी देवतांची पूजा करतो त्याचप्रमाणे त्यांची जी वाहने असतात त्या वाहनांची जर पूजा केली तर त्यातूनही खूप शुभ पुण्य फळाची प्राप्ती होते.
गणपती बाप्पांची दोन वाहन आहेत. एक म्हणजे गजराज आणि दुसरे म्हणजे मूषक उंदीर या दोन्ही प्राण्यांना काहीतरी अन्न वैगरे जस की हत्ती आहे त्या हत्तीला हिरवा चारा खाऊ घालू शकता. मुषकला थोडंसं धान्य घालू शकता. भगवान श्री गणेश मातृ पितृ भक्त आहेत.
म्हणून या गणेश जयंतीला जर शिव परिवाराची पूजा केली शिव परिवार म्हणजे गणपती बाप्पा त्यांचे पिता म्हणजे भगवान शिव शंकर त्यांची माता माता पार्वती अशा या तिघांचा एकत्रित असणारा फोटो. या फोटोची आपण जर पूजा केली तर कुटुंबात कधीही वाद विवाद होत नाहीत. कुटुंबीयांमध्ये प्रेम वाढीला लागते.
<
आपल्या कुटुंबियातील सदस्यांची मनोकामना देखील यामुळे नक्की पूर्ण होतात. जर तुम्हाला मोदक अर्पण करणे शक्य नसेल तर कमीत कमी थोडासा गूळ तरी श्री गणेशाना नक्की अर्पण करा. धार्मिक मान्यता अशी आहे की तुम्ही थोडेसे अक्षत म्हणजे तांदूळ अर्पण केले न तुटले फुटलेले अक्षत आणि दुर्वा केवळ या दोन वस्तूंनी सुद्धा गणपती बाप्पांची पूजा संपन्न होते.
जोतिष शास्त्रामध्ये दान धर्माचं मोठ माहात्म्य सांगितलेले आहे. या गणेश जयंतीला आपण गोर गरीबांना गरजूंना वस्त्र म्हणजे कपडे, धान्य इत्यादी वस्तूंचं दान करा. जेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहात तेव्हा मंदिरात श्री गणेशांची पूजा केल्यानंतर त्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे गोर गरीब असतील त्यांना या वस्तूंचं दान नक्की करा.
आपण आपल्या घरात गणेश यंत्राची सुद्धा स्थापना करू शकता. ते अत्यंत शुभ मानण्यात आले आहे. आणि त्यामुळे घरात सुख समृद्धीचे आगमन होते. गणेश यंत्र आपण नक्की स्थापन करा. गणेश चतुर्थी दिवशी भगवान गणेशांच्या प्रतिमेवर मूर्तीवर जर शुद्ध पाण्याने अभिषेक केला आणि गणपती अथर्वशीर्ष चा पाठ केला गणपती बाप्पांना खव्याचे लाडूचा जर भोग लावला.
आणि भक्तांमध्ये लाडूचे वाटप केले तर त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात. ज्यांच्या जीवनात गरिबी आहे दरिद्रता आहे. श्री गणेशाना आजच्या दिवशी शुद्ध तूप आणि गूळ यांचा भोग दाखवावा. गाईला थोडासा गूळ आणि त्यावर तूप टाकून आपण खाऊ घालावे. धन संपत्ती सदस्यांचे समाधान होईल.
म्हणजे पैश्यासंबंधी गरिबी आहे, दरिद्रता आहे त्या समस्या निघून जातात. जे लोक नोकरी करतात. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी भगवान गणेशाना या गणेश जयंतीला पाच साबुत हळकुंड अर्पण करावीत. ही हळकुंड अर्पण करताना श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करावा. सातत्याने जप करावा. प्रमोशनच्या संधी चालून येतात.
गणेश जयंती आहे म्हणून गणेशाच्या कोणत्याही मंत्राचा ओम गण गणपतये नमः, ओम गण महागणपतये नमः कोणताही मंत्र येतो त्याचा जास्तीत जास्त वेळा जप करावा. त्याने सुद्धा आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.