नमस्कार मित्रांनो,
आजकाल आपण पाहतो की आपला धंदा, व्यवसाय नीट चालत नाही. उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक होतो. पैसा घरात आला की टिकत नाही, उत्पन्न खूप कमी आहे, असलेले पैसे लगेच खर्च होतात. तुमच्या सोबत हे सर्व घडत असेल तर अजिबात घाबरू नका.
कारण मित्रांनो जिथे अपाय आहेत तिथे उपाय सुद्धा आहेत.
जिथे अडचण असते तिथे समाधान सुद्धा असते. जीवनात सर्व बाबतीत सुखी असा कोणीच नाही. शोधून सुद्धा असा मनुष्य सापडणार नाही. प्रत्येकाला काही ना काही अडचणी, समस्या या असतातच.
जीवनात असलेल्या अडचणी, समस्या आपण अगदी साधे व सोपे उपाय करून दूर करू शकतो.
मित्रांनो आज आपण असे काही उपाय पाहणार आहोत हे तुम्ही बुधवारी करू शकता.
आठवड्यातील बुधवार हा श्री गणेश यांचा वार समजला जातो. श्री गणेशाला सर्व दुःखांचे निवारण करणारे दुःख हर्ता, मंगलमूर्ती म्हटले जाते. हिंदू धर्मात आद्य पूजेचा म्हणजेच सर्व देवांमध्ये प्रथम पूजेचा मान हा श्री गणेशाला आहे.
श्री गणेशाचे पूजन हे भौतिक, दैविक व आध्यात्मिक कार्याच्या पुर्तते साठी केले जाते. बुधवारी श्री गणेशाचे विधिवत व श्रद्धेने पूजन केले तर सर्व प्रकारच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात.
आपल्या कुंडली मध्ये जर बुध ग्रह अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी केलेल्या पूजे मुळे तो ग्रह शांत होतो.
चला तर जाणून घेऊयात बुधवारी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत.
पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती
जर तुमच्या घरात निगे टिव्ह ऊर्जा भरलेली आहे, ती ऊर्जा कमी करण्यासाठी तुम्ही किती तरी उपाय केलेले असतील, पण त्याचा काहीही उपयोग होत नसेल, तर बुधवारी आपल्या घरी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती आणावी आणि तिची स्थापना करावी.
असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व वाईट शक्तींचा, वाईट प्रवृत्ती आपल्या घरापासून दूर राहतील, आणि आपल्या घराचं रक्षण होईल.
नकारात्मक ऊर्जा बाहेर पडल्याने आपली जी कामे अडून पडली असतील ती नीट मार्गी लागतील.
गूळ तुपाचा नैवेद्य
जर कितीही कष्ट करून सुद्धा तुमचे समाधान होईल इतके पैसे मिळत नसतील तर बुधवारी गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करून गूळ व तुपाचा नैवेद्य दाखवावा.
पूजन झाल्यानंतर गूळ व तूप गायीला खाऊ घालावे. या उपायाने तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. सर्व मार्गांनी पैसा येईल.
दुर्वा गणेशाचे पूजन
मित्रांनो जर तुमच्या घरी सतत वादविवाद व भांडणे होत असतील. भांडणामुळे घरात सुख व शांती लाभत नसेल तर बुधवारी श्री गणेशाची दुर्वाची प्रतिकात्मक मूर्ती बनवावी.
आपण बनवलेली दुर्वांच्या गणेश मूर्तीला आपल्या देवघरात स्थापन करावे. दररोज या दुर्वा गणेशाचे विधिवत पूजन करावे. यामुळे तुमच्या घरातील भांडण तंटे थांबून घरात शांततेचे वातावरण तयार होईल.
हत्तीला खाऊ घाला चारा
जर तुमच्या घरात प्रत्येक गोष्टीत अडचणी येत असतील, काही केल्या अडचणी कमी होत नसतील तर बुधवारी कोणत्याही हत्तीला हिरवा चारा खाऊ घालावा.
त्यानंतर गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाला आपल्या अडचणी सांगून त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. आपल्या जीवनात असलेल्या अडचणी दूर करायला भगवान गणेश आपल्याला नक्की मदत करतील.
हिरवा चारा खायला घालण्यासाठी हत्ती नसेल तर तुम्ही एखाद्या गायी ला सुद्धा हिरवा चारा घालू शकता.
हा उपाय केल्याने काहीच दिवसात तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील.
तांब्याच्या ताटातून बुंदीचे लाडू
बुधवारी सकाळी स्नान झाल्यानंतर एका तांब्याच्या ताटात चंदनाच्या लेपाने ओम गणपतये नमः हा मंत्र लिहावे. त्यानंतर त्यावर 5 बुंदीचे लाडू ठेवावेत आणि नंतर ते ताट गणेश मंदिरात अर्पण करावे.
या उपायामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते.
गुळाच्या ढेपी
बुधवारी सकाळी स्नान वगैरे करून जवळ असलेल्या गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना 21 गुळाच्या लहान ढेपी अर्पण कराव्यात. त्यानंतर त्यावर थोड्याशा दुर्वा अर्पण कराव्यात.
नंतर थोडा गूळ आणि तूप गायीला खायला घालावे. या उपायाने धन संबंधित अडचणी दूर होतात.
गणेशाचा अभिषेक
शास्त्रामध्ये श्री गणेशाचा अभिषेक करण्यासाठी विधी सांगितले आहेत. बुधवारी श्री गणेशाचा अभिषेक केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला होतो. गणेशाचा अभिषेक शुद्ध पाण्याने करावा.
गणपती चा अभिषेक करण्यासोबतच गणपती अथर्वशीर्ष पठण सुद्धा करावे. त्यानंतर माव्याचे लाडू नैवेद्य म्हणून ठेवावे आणि नंतर प्रसाद म्हणून वाटून टाकावे.
शक्य असलेल्या वस्तूंचे दान करावे
बुधवारी कोणत्याही गणेश मंदिरात जाऊन आपल्याला शक्य असलेल्या वस्तूंचे दान करावे. दान केल्याने आपल्या पुण्यात वाढ होते आणि श्री गणेशाची सुद्धा आपल्यावर कृपा राहते.
जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थानी असेल तर बुधवारी गणेशाचे पूजन केल्याने बुध ग्रह सुद्धा शांत होतो. आणि गणेशाची सुद्धा आपल्यावर कृपा राहते.
गणेशाला दुखहर्ता अस म्हटलं जातं. त्यामुळे गणेश आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, समस्या दूर होतात. आणि आपल्यावर धन, धान्य, ऐश्वर्य,वैभव प्रदान करतात.
मित्रांनो उपाय सोपे आहेत एकदा करून पहा, तुम्हाला खात्री पटली तरच पुन्हा करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.