2 एप्रिल शनिवार गुढीपाडवा, गुढी उभारताना करा हा 1 सोपा उपाय घरात

नमस्कार मित्रांनो,

गुढीपाडवा येत आहे. नवीन वर्षाचा चैत्र महिन्याचा पहिला दिवस, चैत्रनवरात्रीचा पहिला दिवस. मित्रांनो या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल. तुम्हाला जे हव ते सगळं काही तुम्हाला मिळून लागेल आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही.

तुम्हाला फक्त जेव्हाही तुम्ही गुढी उभाराल तेव्हा गुढी उभारतांना तुम्हाला हा एक सोपा उपाय करायचा आहे. मित्रांनो तुमच्या प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते. गुढी उभारताना आपण साडी, तांब्या, साखरेची माळ, लिंबाचा पाला असे सर्व लावले जाते.

हे सर्व लावून झाल्यावर आपण घराच्या बाहेर दरवाजाकडे, खिडकीकडे ती गुढी उभारत असतो, ती गुढी लावत असतो. तर मित्रांनो गुढी उभारण्याचा आधी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त अकरा रुपये लागणार आहेत आणि एक छोटा कापडाचा तुकडा लागणार आहे.

मग तो पांढरा, काळा, पिवळा, हिरवा कोणताही असेल तरी काही हरकत नाही फक्त तुम्हाला एक छोटासा कापड किंवा रुमाल हवा. त्या कापडमध्ये तुम्हाला हे अकरा रुपये बांधायचे आहेत. अकरा बांधून झाले की, तुम्ही गुढीला जो तांब्या लावणार आहे त्या तांब्यामध्ये हे बांधलेले अकरा रुपये तुम्ही टाकून द्यायचे.

तो तांब्या तुम्ही गुढी उभारताना लावायचा आहे. मित्रांनो त्यानंतर तुम्ही गुढी तुमच्या घराबाहेर लावू शकता. जेव्हाही तुम्ही बारा वाजयाच्या आता तुम्ही गुढी खाली उतरवाल देवघरात तिची पूजा कराल तेव्हा तो तांब्या काढून घ्यायचा आहे. गुढीमध्ये म्हणजे तांब्या मध्ये ठेवलेले ते अकरा रुपये त्या कापडामध्येच बांधलेले असून द्यायचे आहे.

आणि ते बांधलेले अकरा रुपये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे किंवा दुकान असेल तर दुकानाचा गल्लामध्ये ठेवायचं. याने तुमच्या घरात, दुकानात बरकत येईल पैसा खर्च होणार नाही, पैसा येऊ लागेल, धन वृद्धी होईल सुख-समृद्धी वाढेल हा एक उपाय सोपा उपाय नक्की करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *