उद्या 8 ऑगस्ट… मोठी आषाढी अमावस्या… या ठिकाणी लावा दिवा… माता लक्ष्मी येईल धावत…

नमस्कार मित्रांनो,

येत्या रविवारी म्हणजेच ८ ऑगस्ट २०२१ यादिवशी आषाढ अमावस्या आहे. या आषाढी अमावास्येलाच दीप अमावस्या असेही म्हटले जाते.

यादिवशी आपल्या घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि त्यांची मनोभावे पूजा केली जाते. सध्याच्या काळात या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करून हा दिवस साजरा केला जातो.

परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात अग्नीला अग्निदेवता असे म्हटले जाते आणि या अग्निदेवतेची एक रूप म्हणजे आपल्या घरातील दिवा.

मित्रांनो, हा दिवा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करून आपल्या जीवनात प्रकाश घेऊन येतो आणि म्हणूनच या दीप अमावस्येला दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. आपल्याला या दिव्यांची पूजा करायची आहे.

दीपा अमावास्येला सकाळीच हे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत. एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर हे दिवस ठेवायचे आहेत. पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आणि या दिव्यांची हळद-कुंकू, अक्षता, फूले वाहून मनोभावे पूजा करायचे आहे.

आणि संध्याकाळी हे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा हे दिवे प्रज्वलित करताना ज्यावेळी वाती लावणार आहात त्यावेळी जोड वात आपल्याला लावायची आहे आणि कापसाचीच वात लावायची आहे.

अनेक जण दिव्यामध्ये लाल धाग्याची वात लावतात तर असे करू नका. या दिवशी कापसाच्या वातीचाच आपल्याला वापर करायचा आहे. या दिवशी पूजेमध्ये तुम्ही कणकेचे दिवे सुद्धा बनवून प्रज्वलित करू शकता.

पूजा झाल्यानंतर या दिव्यांना आपल्याला कोणताही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर दिवे प्रज्वलित केल्यावर आपल्याला एक श्लोक म्हणायचं आहे. मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे आपण दिव्याला प्रार्थना करणार आहोत की आपल्या घरातील इडा पिडा, सर्व ग्रह दोष, वास्तु दोष नाहीसे होऊ दे. आपल्या घरातील रोगराई दूर होऊन आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश येऊ दे.

मंत्र पुढील प्रमाणे आहे-
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

मित्रांनो हा श्लोक बोलून आपल्याला हात जोडून दिव्याची प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरातील सर्व इडापिडा, रोगराई दूर जाऊन आपल्या घरामध्ये आनंद, सुख शांती, ज्ञानाचा प्रकाश यावा यासाठी प्रार्थना करायची आहे.

पूजा झाल्यानंतर आपल्या घरात जे लहान मुले-मुली असतील त्यांची सुद्धा आपल्याला या दिव्यांनी म्हणजे आपण जे कणकेचे दिवे बनवणार आहोत त्या दिव्यांनी औक्षण करायचे आहे. दिव्याने त्यांना ओवाळायचे आहे.

यादिवशी आपल्या ग्रह दोष निवारण्यासाठी आपण काही विशेष उपाय सुद्धा केले पाहिजेत. कारण अमावस्येला आपण जे काही उपाय करतो ते विशेष फलदायी ठरतात आणि ही विशेष दीप अमावस्या आहे त्यामुळे या अमावास्येला आपण काही विशिष्ट उपाय नक्की करावे.

या दिवशी तुम्ही पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळस यापैकी कोणत्याही एका झाडाची किंवा शक्य असल्यास सर्व झाडांची तुम्ही लागवड करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह दोष नाहीसे होतात.

तर मित्रांनो या दीप अमावस्याला अशाप्रकारे दिव्यांची पूजा करून तुम्ही एका झाडाची लागवड अवश्य करा.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.