नमस्कार मित्रांनो,
मकर रास
आर्थिक लाभ करून देणारे वर्ष आहे. गुरु शुक्र नव पंचम योग करीत आहेत. प्रतिष्ठा वाढेल. शुभ कार्य घडतील भाग्यात मंगळ बुध शुभ फळ देणारा ठरेल. धार्मिक गोष्टीमध्ये मन रमेल. प्रवास छोटे किंवा मोठे फल देणारे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी परिचय होतील. आरोग्य ठिक राहील. घरातील शांतता भंग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. उत्तम सप्ताह.
कुंभ रास
अष्टमात प्रवेश करणारा मंगळ प्रवासात जपून रहा असं सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. शत्रू टपले आहेत. स्थान बदल संभवतो. उच्च शुक्र अनेक प्रकारे भाग्याचे मार्ग मोकळे करेल. करार सफल होतील. आर्थिक बाजू चांगली राहिल. आरोग्य थोडे जपा. काहींना भावंडाची चिंता सतावू शकते. मात्र गुरु सर्व चिंता हरण करेल.
मीन रास
जोडीदाराला जपा, सोबत प्रवास, खरेदी, खर्च असा साल आहे. अष्टमात येणारा शुक्र उच्च शिक्षण, गूढ शास्त्राची आवड निर्माण करणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. मधुमेही व्यक्तीनी जपून राहावं. शत्रू वर मात करणार आहात. उत्तरार्ध अनुकूल. गुरु उपासना करावी. शुभम भवतु!!
कर्क रास
चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा शुक्र गृहसौख्य उत्तम देईल. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. नोकरीसाठी फार चांगला काळ आहे. आईवडील तुमच्यावर फार खूश राहतील. मंगळाचा प्रवेश राशीच्या तृतीय स्थानात होणार आहे. संभाषण चातुर्य कमालीचं वाढेल. वकील, कलाकार यांना उत्तम राहील. पण कटू शब्द, वाद टाळा. त्याने गैरसमज होतील. प्रवास योग आहेत. जरा जपून, गुरू अष्टमात आहे. उपासना करीत रहा.
सिंह रास
धन स्थानात प्रवेश करणारा मंगळ खर्चात अतोनात वाढ करेल. वाणी कठोर होईल. कुटुंबात कलह होण्याची शक्यता. कटू वचन टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात. गुरु बळ आहे. त्यामुळे निभावून न्याल. तृतीय स्थानात येणारा शुक्र कलाकारांना शुभ फळ देणारा ठरेल. तुमच्या बुद्धीचा वापर करून एखाद्या नवीन कामाला गती द्याल. पराक्रम व चिकाटी वाढवेल. नवीन कलेमध्ये रुची निर्माण होईल. एकूण मिश्र फळ देणारा साल आहे.
कन्या रास
राशीत प्रवेश करणारा मंगळ व बुध स्वभाव आक्रमक करतील. प्रकृतीकडे लक्ष असू द्या. स्त्रियांनी काही विशेष तक्रार असेल तर लवकर तपासणी करा. गुरु कृपेचा लाभ होईल. धन स्थानात येणारा शुक्र अतिशय सुंदर फळ देईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कपडे दागिने खरेदी कराल. गुरु नोकरीसाठी प्रयत्न केला तर यश मिळवून देईल. एकूण साल शुभ फळ देईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.