नमस्कार मित्रांनो,
मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा जन्म घेते का? माणसाचा पुन्हा जन्म होतो का? तसेच, हिंदूधर्म शास्त्रातसुध्दा असे मानले जाते की, माणसाचा पुनर्जन्म होतो. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत की या गोष्टी जाणून घेतल्यानंतर, या 5 गोष्टीमधली एखादी जरी गोष्ट तुमच्या बाबतीत घडत असेल तर लक्षात घ्या, तुमचा पुनर्जन्म नक्की झालेला असेल. चला मग जाणून घेऊया या 5 गोष्टी कोणत्या आहेत.
मित्रांनो कधी असे झाले का? की तुम्हाला वारंवार एकच स्वप्न पडतं. त्यामध्ये तुम्हाला असे काही लोक दिसतात. तुम्हाला हे लोक ओळखीचे वाटतात. हया जन्मात तुम्ही या लोकांना कधीही पाहिले नाही. मात्र तरीही हे लोक तुम्हाला तुमच्या परिचयाचे आणि जवळचे वाटतात. मित्रांनो, हे स्वप्न तुम्हाला इशारा देतात की, तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. ज्या लोकांना तुम्ही स्वप्नात पाहताय, या लोकांशी तुमचे खूप जवळचे निकटचे संबंध होते.
एखाद्या गोष्टीची विनाकारण भीती वाटणे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते, एखाद्या व्यक्तीला अंधाराची भीती वाटते. एखादा व्यक्ती उंच डोंगरावर गेला, उंच इमारतीवर गेला तर त्याला त्या उंचीची खूप भीती वाटते. मात्र या जन्मामध्ये भीती वाटावी अशा प्रकारची कोणतीही घटना या जन्मात घडलेली नाही, तरीही या गोष्टीची भीती का वाटते. कदाचित पुनर्जन्मामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतील.
कदाचित तुम्ही पाण्यामध्ये बुडत होता असाल, तुमचा मृत्यू पाण्यात बुडून झालाय. कदाचित तुम्ही उंच इमारतीवरून पाय घसरून तुम्ही खाली पडलाय. कदाचित अंधारामध्ये तुमच्या बाबतीत काहीतरी अनि ष्ट घटना पुनर्जन्मात घडलेली आहे. त्याची भीती तुम्हाला अजूनही या जन्मात वाटत आहे. ही गोष्ट या गोष्टीकडे संकेत करते की, तुमचा पुनर्जन्म झालेला आहे.
मित्रांनो, कधी असे झाले का? की एखाद्या व्यक्तीशी तुमची काहीही ओळख नाही आहे तुमचा परिचय नाहीय. तरीही तुम्हाला ती व्यक्ती जवळची व ओळखीची वाटते आहे. तरीही त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेम वाटते, आत्मीयता वाटत आहे. हे सर्व काय आहे. मित्रांनो, कदाचित पुनर्जन्मात ती व्यक्ती कदाचित तुमची प्रेमिका असेल, तुमचा प्रियकर असेल, पती असेल, पत्नी असेल.
म्हणूनच या जन्मामध्ये ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येते, तेव्हा ती तुम्हाला तुमच्या जवळची, परिचयाची वाटते. मित्रानो हा देखील तुम्हाला संकेत आहे की, तुमचा पुनर्जन्म अगदी नक्की झालेला आहे.
मित्रांनो बरेचदा आपल्याला नक्की पुढे काय होईल हे समजते. होय अगदी आश्चर्यकारक अशा प्रकारची गोष्ट आहे. एखादी विचित्र गोष्ट, एखादी नको असलेली गोष्ट घडणार आहे हे आपल्याला आधीच कळते. वैज्ञानिक ह्याला “सि क्स्थ सेन्स” असे म्हणतात. मित्रांनो आपण ज्या गोष्टींचा विचार देखील केलेला नसतो त्या गोष्टी घडतात. ही गोष्टसुद्धा हया गोष्टीकडे निर्देशक करते की, आपला पुनर्जन्म झाला आहे. आपली आत्मा आपले काय होणार आहे याचा अनुमान आधीच लावते.
एखादया गोष्टीविषयी खूप आपुलकी वाटते. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला ही लहानलहान मुले दिसतात. एखादा लहान मुलगा रस्त्यावर चाललेल्या भिकाऱ्याला आपल्या हातातले चॉकलेट देतो. केक देतो. पैसे त्याला द्यावेत असे वाटते. हे सर्व काय आहे. त्या लहान मुलाला गरीब आणि श्रीमंत यामधले भेद माहीत नाहीत. समोरची व्यक्ती गरीब आहे, भिकारी आहे, गरजू आहे, भुकेलेली आहे हे त्याला माहीत नाही मात्र तरीही त्याचे हात आपल्या हातातील वस्तू देण्यास प्रवृत्त करतात.
<
कारण तुम्ही तुमच्या पुनर्जन्मामध्ये कदाचित सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असाल. एखादया व्यक्तीला सायकलींची भरपूर आवड आहे, पाण्यात पोहण्याची आवड आहे. धनुष्यविद्येची आवड आहे. तुमच्या या गोष्टीची केव्हाच संबंध आलेला नाही आहे, मात्र एखाद्या वेळेस आपोआप हातात सायकल येताच ती आपण अगदी वेड्यासारखी चालवतो.
तसेच धनुष्यविद्या नसताना ते आपण अगदी सहजरीत्या धनुष्यबाण चालवितो. त्याचप्रमाणे, नदी दिसतास, तलाव दिसतास, त्यामध्ये उडी टाकून पोहण्याचे मन करते. त्यात प्रचंड आवड दिसते तर मित्रांनो, अशी आवड असेल तुमच्यामध्ये अगदी लहनपणापासून, तर लक्षात घ्या पुनर्जन्मामध्ये मध्ये तुम्ही चांगले सायकलिंग करणारे असाल, चांगले पोहणारे असाल. तसेच धनुर्विद्यामध्ये चांगले निष्ट असाल. हया घडत असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला संकेत देतात की, तुमच्या पुन्हा जन्म झाला आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.