नमस्कार मित्रांनो,
तोंड आल्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारचे तिखट पदार्थ खात येत नाहीत तसेच आंबट किंवा तुरट पदार्थ खायलासुद्धा त्रास होत असतो. एकंदरीत सांगायचे असेल तर आपल्या तोंडाची आग होत असते किंवा झोंबत असते. याची काही प्रमुख कारणे आहेत जसे की, मसालेदार पदार्थ खाणे, दांताची योग्य प्रकारे निगा न राखणे.
हिरड्यांमधून रक्त येणे. तसेच आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी आणि आर्यन कमी झाले असेल तर आपल्याला तोंड येऊ शकते. काहीजणांना मसाला गरम म्हणून तोंड येते. दातांमध्ये गालाचा आणि जीभेचा भाग चावला गेल्याने तोंड येते. तर अशी काही प्रमुख कारणे आहेत.
तर मित्रांनो, याच्यावर उपाय काय ते पाहूया. पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. या पाण्याने गुळण्या केल्यावर आपल्याला जे तोंडात छाले पडले आहेत, जखम झाली असेल ती भरून येण्यास मदत होते.
तसेच त्यांचा जो लालसरपणा असतो तो पण कमी होतो. दुसरा उपाय आहे. आपल्याला त्या ठिकाणी मध लावायचा आहे. मित्रांनो, मधाचे एक दोन थेंब जरी आपण जिथे छाले झालेले आहेत किंवा लालसर वाटत आहे किंवा खूप दुखत आहे, अशा ठिकाणी मध लावल्यास आपल्याला आराम मिळत असतो.
आणि ते अल्सर भरून येतात. पुढील उपाय आहे जाईची पाने चगळणे. हा उपाय खूप चांगला आहे. जाईची ५ ते ७ पाने स्वच्छ धुऊन घ्यायची. त्यानंतर पाने हळूहळू चगळायची आहेत. चगळताना लक्षात ठेवायचे आहे की, त्या पानांचा रस आपल्या जीभ आणि गालांच्या अंतर्भागात लागेल अशाप्रकारे चगळणे.
मित्रांनो, त्या पानांचा रस गिळला तरी काही अडचण येत नाही पण शक्यतो रस आपण थुकून टाकावा. आणि दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय करायचा आहे. यांनीसुद्धा आपल्याला आलेले तोंड लवकर बरे होते. पुढचा उपाय आहे तुळशीची पाने खाणे.
मित्रांनो, तुळशीच्या तीन ते चार पानांचा रसदेखील जीभ आणि गालांच्या अंतर्भागाशी लागेल याची काळजी घ्यावी अशाप्रकारे खावीत. या उपायानेसुद्धा तोंडातील जखम भरून येते. आणि ज्यांना खूपच अल्सर झालेले आहे किंवा त्यांच्या खूप जखमा झालेल्या आहेत अशा व्यक्तीनी हळद त्या ठिकाणी लावा.
त्यांनी अल्सर लवकर भरून येतात. तर मित्रांनो यातील जो उपाय तुम्हाला सोपा आणि योग्य वाटेल तो करावा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.