3 एप्रिल स्वामींचा प्रकट दिवस, करा या एका मंत्राचा जप : तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो,

3 एप्रिल हा स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. हा दिवस म्हणजे प्रत्येक सेवेकऱ्यांसाठी विशेष भाग्याचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी करण्यात आलेली स्वामी समर्थांची सेवा ही मोठी भाग्याची मानली जाते.

स्वामी समर्थांचा हा प्रकट दिन प्रत्येक सेवेकरी आणि भक्ती वर्गातून मोठ्या भक्तीने व महाराजांच्या श्रद्धेने साजरा करण्यात येतो. मित्रांनो या दिवसाला दुसरे विशेष महत्त्व असे आहे की या दिवशी तुम्ही सेवा कराल आणि त्यानंतर तुम्ही तुमचे जे मागणी असेल ते महाराजांकडे स्वामींकडे कराल ती तात्काळ पूर्ण होते तुम्हाला त्या सर्व कामात यश लाभते.

मित्रांनो हे आम्ही कोणाचीही ऐकून किंवा सांगण्यावरून आपणाला सांगत नाही तर तो अनुभवातून ही विशेष माहिती येथे आपल्यासाठी नमूद करत आहोत. तर मित्रांनो फारशी विषयांतर न करता जाणून घेऊया आजच्या स्वामी समर्थांच्या विशेष प्रकट दिनानिमित्त करता येणाऱ्या एका सोप्या सेवेबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो 3 एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. यादिवशी आपणाला एक मंत्र म्हणायचं आहे. तो एकदा म्हणा, 11 वेळा म्हणा , 21वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, 101 वेळा म्हणा, 1001 वेळा म्हणून यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता.

विशेष म्हणजे मित्रांनो या दिवशी तुम्हाला हा मंत्र म्हणण्यासाठी कोणत्याही वेळी ची वाट पाहावी लागणार नाही किंवा कोणताही मुहूर्त पहावा लागणार नाही या दिवशी तुम्ही दिवसभरात तुम्हाला जी वेळ शक्य असेल त्यावेळी हा मंत्र वर सांगितल्याप्रमाणे म्हणायचा आहे.

हा मंत्र म्हणण्यापूर्वी आपण आपले हात पाय स्वच्छ धुऊन स्वामींच्या मूर्ती पुढे किंवा प्रतिमा पुढे दिवा अगरबत्ती करून, फुले असल्यास फुले वाहून आसनस्थ होऊन बसायचे आहे आणि खालील दिलेला मंत्र जितका वेळ आहे त्यावेळी तितका वेळ आपण म्हणायचा आहे. ओम श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमः

मित्रांनो हा मंत्र आपणाला या दिवशी म्हणायचा आहे. हा मंत्र अगदी सोपा आणि साधा आहे. मात्र मोठा फलदायी व अत्यंत लाभदायी असा हा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे. या मंत्रांमध्ये विशेष अशी शक्ती असल्याचे तुम्ही श्रद्धेने जेव्हा हा मंत्र म्हणाले तेव्हा तुम्हाला अनुभव येतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.