नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा ज्यांची चतुर्थी महिन्यातून 2 वेळेस येते, एक विनायक चतुर्थी व दुसरी संकष्टी चतुर्थी होय. विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केली जाते. यावेळी म्हणजे जून महिन्यात विनायक चतुर्थी सोमवारी 14 जून रोजी आली आहे.
विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हणतात, त्यांची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी विविध उपाय केल्याने वास्तुशास्त्र आणि ग्रह दोष दूर होतात. सकलांचे आराध्य व दैवत म्हणजेच गणपती बाप्पा, यांची उपासना केल्यास इच्छित फलप्राप्ती होते.
मित्रांनो भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीची देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात भरपूर यश मिळेल.
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. विनायक चतुर्थीला विनायकाची ही कथा मनोभावे वाचल्यास, पठण केल्यास गणेशाचा वरदहस्त आपल्यावर राहतो.
मित्रांनो शिवपुराणानानुसार एक कथा सांगितली जाते, पार्वतीने एके दिवशी नंदीस द्वारपाल म्हणून नियुक्त करून माता पार्वती स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने लालबुंद झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले.
नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानासाठी गेली, तेव्हा शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. प्रथम कुमारासोबत शिवाचा वाद झाला व नंतर या वादाचे रूपांतर भयानक होऊन युद्ध झाले. यावेळी शंकरांनी त्रिशुलाने त्या कुमाराचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रोधीत होऊन सृ ष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केली.
मित्रांनो त्यानंतर नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुन र्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकराने त्यासाठी होकार दिला, परंतु कुमाराचे म स्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या गणांना उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे म स्तक आणण्याची आज्ञा केली.
तेव्हा गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुं डक्याच्या साहाय्याने कुमारास जि वंत केले. भगवान शंकराने या कुमारास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला. कुठल्याही पूजेच्या आधी पहिला मान गणपती बाप्पांना असतो आणि त्यांचीच पूजा केली जाते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करतो . अशी ही सुंदर विनायकाची, गजाननाची कथा सर्वांनी पूर्ण श्रद्धेने पठण करा.
मित्रांनो कथा आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.