12 ते 19 डिसेंबर दत्त जयंती सप्ताह इच्छापूर्तीसाठी पारायण करण्याचा सुवर्णकाळ

नमस्कार मित्रांनो,

दत्त जयंती सप्ताह आहे तो सप्ताह म्हणजे 12 डिसेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत हा सप्ताह आहे. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की, दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. परंतु पारायण कसे करावे? कधी करावे? कधी सुरुवात करावी? कधी समाप्ती करावी? काय खावे काय प्यावे आणि याचे नियम काय? त्याच्याबद्दल भरपूर प्रश्न सेवेकरांच्या मनात असतात. आजचा ही माहिती पूर्ण वाचा.

सर्व माहिती तुम्हाला आजच्या या लेखाद्वारे मिळणार आहे. मित्रांनो श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारका अतिसामान्यांसाठी गुरु प्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महा प्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. परंतु मित्रांनो हा कसा करायचा? याचे कोणते नियम पाळावे? तर मित्रांनो श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शुक्रवारी करावा आणि त्याची सांगता म्हणजेच समाप्ती शुक्रवारीच करावी.

कारण शुक्रवार हा श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या निजानंदाचा दिवस असतो. म्हणून शुक्रवारी सुरुवात करा शुक्रवारीच समाप्ती करा. दत्त जयंती सप्ताह आहे म्हणून तुम्ही 12 डिसेंबरपासून पारायण तुम्ही सुरुवात करू शकता आणि 19 डिसेंबरच्या दिवशी त्याची समाप्ती करू शकतात. मित्रांनो श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर गुरूवारच्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे.

म्हणजे छोट्या छोट्या तुम्ही पाच चपात्या करा आणि आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारच्या दिवशी तुम्ही एक चपाती गाईला खाऊ घाला आणि चार चपात्या कुत्र्यांना खाऊ घाला. वेगवेगळी चार कुत्रे पाहिजे आणि शुक्रवारपासून दुसऱ्या दिवशी सकाळपासून तुम्ही पारायण वाचू शकता. श्री गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करायचे असते. आणि वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करावा.

व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी. मित्रांनो दोन तीन गोष्ट तुम्हाला पारायनाच्या आधी करायचे आहे. तुमच्याकडे फोटो असेल दत्त महाराजांचा तर तुम्ही दत्त महाराजांच्या फोटोची सगळ्यात आधी पूजा करायची त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष वाचून मग पारायणाला तुम्ही सुरुवात करायचे आहे. श्री गुरूचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान तुम्ही करू शकतात. दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावेत.

मग तुम्ही सकाळी म्हणजेच पहाटे तीन वाजता उठू शकता, चार पाचला वाजता सुद्धा उठू शकता. म्हणजे तीनपासून संध्याकाळी दुपारचे चार वाजेपर्यंत तुम्ही पारायण केव्हाही वाचू शकतात. सकाळी वाचल्याने ते सहज होते अशी मान्यता आहे. फक्त दुपारच्या बारा ते साडेबारा या दरम्यान पारायण वाचायचे नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पर अन्न खाऊ नये. आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये.

दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी व संध्याकाळी एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला सातही दिवस एकच धान्य खायचे आहे. आणि जर तुम्ही बाहेर राहत असाल तर तुम्ही ते एकच धान्य बाहेर विकत म्हणजेच मेस किंवा हॉटेलला खाऊ शकता. जर काही समस्या असतील तर, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलाचे जोड वापरावे.

श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. मित्रांनो श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत सोच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात मृत्यू सोच जर आले किंवा जननसोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसर्‍यांकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट ते सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत काही समस्या काही अडचण आली तर अशा वेळेस ते सांभाळावे आणि गोमूत्र शिंपडावे. आणि पारायण दुसर्‍यांकडून पूर्ण करून घ्यावे.

मित्रांनो सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे हा नियमच आहे. मित्रांनो श्री गुरुचरित्र वाचण्याचे पूर्वापार एक पद्धत आहे. म्हणजे पहिला दिवस तुम्ही अध्याय 1 ते 9 वाचू शकतात. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21 वाचू शकतात. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29 वाचू शकतात. चौथा दिवस अध्याय 30 ते 35 वाचू शकतात.

पाचवा दिवस अध्याय 36 ते 38 वाचू शकतात.सहावा दिवस अध्याय 39 ते 43 वाचू शकतात आणि सातव्या दिवशी अध्याय 44 ते 53 वाचू शकतात. या नियमांनी जर अध्याय वाचले तर अध्याय सहजच आपले पूर्ण होत असतात. त्यात कोणताही बदल करू नये. मित्रांनो श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीनेच करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण किंवा 49 दिवस 7 पारायण करायची देखील पद्धत आहे.

मित्रांनो 7 दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी म्हणजे समाप्ती करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याकरता नैवेद्य मांडावे. म्हणजे तुम्हाला दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य, कुलदेवतेसाठी एक नैवेद्य, स्वामी समर्थ महाराजांसाठी एक नैवेद्य आणि आपण जो ग्रंथ वाचत आहोत त्यासाठी एक नैवेद्य असे चार नैवेद्य काढायचे आहेत.

आणि त्यातला जो ग्रंथासाठी पारायणासाठी जो आपण नैवेद्य काढलेला आहे तो गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच खाल्ला तरी चालतो. मित्रानो श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधी मध्येसुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू द्यायचा नसतो. ती सेवासुद्धा करायची असते. शक्य तोवर तुम्हाला भूमीशहन करावे. कॉटवर कधीच झोपायचे नसते.

मित्रांनो श्री गुरुचरित्र तीन दिवसीय कधीच वाचु नये. एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्र सेवेसाठी करावे. जर वैयक्तिक आपल्या इच्छेसाठी आपल्यासाठी स्वतःसाठी घरासाठी परिवारासाठी आपण पारायण करत असू तर ते सात दिवसांचेच पारायण करायचे असते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *