नमस्कार मित्रांनो,
10 रुपयांची नोट लाल धाग्याने अश्या प्रकारे बांधा की लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. मोठ्या प्रमाणात धन, वैभव, ऐश्वर्य तसेच पैसा तुमच्या जीवनात निर्माण होऊ लागेल.
अनेकांना या गोष्टी पटत नाही, त्यांचं मन मानता नाही की अश्या प्रकारे हे छोटे छोटे उपाय आपल्या जीवनात धन संपदा निर्माण करू शकतात.
मित्रांनो संख्या शास्त्र अश्या नावाचा प्रचंड अगदी अतर्क्य अश्या प्रकारचं शास्त्र आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक अंकाचा एक वेगळा वैशिष्ट्य आणि गुणधर्म सांगितलेला आहे.
एक हा असा मूलांक आहे की जो आपल्या जीवनात लक्ष्मी ला आकर्षित करतो. केवळ पैसाच नव्हे तर एक हा मूलांक सूर्य देवाचा सुद्धा आहे आणि म्हणूनच आपण हा उपाय आपण रविवारी करतो आहे.
रविवारचा दिवस हा सुर्यनारायणाचा मानला जातो. आणि अश्या या रविवारी दहा रुपयांची नोट लाल धाग्यात आपण अश्या प्रकारे बांधणार आहोत की आपल्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत बनेल.
समाजा मध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. या ना त्या कारणास्तव समाजात तुमचा नाव लौकिक होईल.
मित्रांनो, हा उपाय करताना आपण जी नोट वापरणार आहोत ती अगदी नवीन, कोरी, कडकडीत असावी. जुनी, फाटलेली, अगदी विरुन गेलेली असल्या प्रकारची नोट अश्या प्रकारचे तोडगे करताना वापरू नये.
रविवार च्या दिवशी आपण हा उपाय करू शकता, किंवा कोणताही शुभ दिवस असेल शुभ तिथी असेल, त्या वेळी सुद्धा हा उपाय करता येतो.
पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने पूर्ण निष्ठेने आपल्या कुल देवतेच नाव घेऊन आपण हा उपाय करायचा आहे.
आपण हा उपाय दिवसा ही करू शकता किंवा रात्री ही करू शकता. कोणतीही वेळ हा उपाय करण्यासाठी योग्य आहे.
त्यातल्या त्यात सकाळी उठल्या बरोबर स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रधान करून आपल्या देवघरा समोर बसून जर आवण हा उपाय केलात तर त्याचे परिणाम खूप शुभ मिळतात.
आपलं मुख, आपले तोंड हे पुर्वे कडे असेल याची काळजी घ्या. जर तुम्ही बाहेर गावी आहेत किंवा इतर ठिकाणे आहेत जिथे देवघर नाहीये. तर काळजी करू नका तरी सुद्धा पूर्व दिशेला मुख करून ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचे आहे.
बसण्यापूर्वी आपल्या खाली एक कापड अंथरा. एखादे आसन ठेवा. त्यावर आपण बसायचं आहे. जी नोट आपण हा उपाय करण्यासाठी वापरणार आहोत, त्या नोटेवर थोडेसे गंगाजल शिंपडा.
हे गंगाजल म्हणजे पवित्र गंगा नदीच पाणी असत, जर तुमच्या घरात गंगा जल नसेल तर आपण जवळ पासच्या पूजा घराच्या सामानाच्या दुकानातून सहज मिळून जाईल.
मित्रांनो जर गंगा जल नसेल, तर आपल्या घरात देवघरात गंगा जल अवश्य ठेवा. हे गंगाजल अनेक उपाय व तोडगे करण्यासाठी सुख समृद्धी साठी खूप मोठी भूमिका पार पाडत असत.
अश्या प्रकारे आपण अगदी थोडेसे गंगाजल या नोटेवर शिंपडायच आहे जर गंगाजल नसेल तर अगदी थोडेसे साधे पाणी शिंपडले तरी चालेल.
त्यानंतर लाल चंदन हे लाल चंदन सुद्धा आपल्या देवघरात असायला हवं. अनेक देवीदेवतांची पूजेत हे वापरतात. लाल चंदन नसेल तर आपण लाल कुंकू सुद्धा वापरू शकतो.
कुंकुवा मध्ये थोडासा पाणी टाकून, अगरबत्ती किंवा एखादी कडी पेटी मधील कडी घेऊन नोटे वरती कुंकवाचे किंवा लाल चंदनाचे 10 टिपके काढायचे आहेत, मोजून हे 10 टिपके काढायचे आहेत.
10 रुपयांची नोट त्याचा मूलांक 1 आहे. रविवारच्या दिवशी सुर्यादेवाच्या वारी करत आहोत आणि टिपके सुद्धा 10 काढत आहोत.
त्यानंतर हाळदीचा एक टिळक किंवा ठिपका त्या ठिकाणी काढायचा आहे. त्यानंतर एक काळी मिरी जी स्वयंपाक घरात सर्वांच्या उपलब्ध असते, ही त्यावर ठेवायची आहे मात्र ती काळीमिरी शाबूत असावी. तुटलेली किंवा खराब झालेली नसावी.
आणि त्या काळीमिरी सोबत एक गव्हाचा दाणा ठेवावा. मित्रांनो काळी मिरी ही तंत्र मंत्र शास्त्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते, आणि हा जो गव्हाचा दाणा आहे, जो सोनेरी रंगाचा, जो गव्हाळ वर्णाचा असतो, सूर्य देवांना जे रंग प्रिय आहेत. त्यापैकी हा एक रंग.
मित्रांनो अश्याप्रकारे ही सगळी सामग्री त्यामध्ये ठेवल्यानंतर, या नोटेची गोलाकार अशी व्यवस्थित घडी घालायची आहे. थोडक्यात रोल करायचा आहे. आणि ती नोट व्यवस्थित गुंडाळायची आहे.
सर्व सामग्री त्या नोटेत राहील याची काळजी घ्यायची आहे, आणि वरून आपण हा लाल धागा बांधायचा आहे. हा लाल धागा बाजारात सहज मिळतो.
जर लाल धागा नसेल तर सफेद धागा लाल कुंकुवा मध्ये किंवा लाल चंदना मध्ये बुडवून त्याला लाल रंग प्रधान करायचे आहे, आणि हा असा लाल धागा नोटेला बांधायचा आहे.
त्यानंतर ही नोट आपण आपल्या उजव्या हातात घेऊन एक मंत्र आम्ही सांगत आहोत तोच जप आपल्याला 108 वेळा आपण करणार आहोत. मंत्र अश्याप्रकारे आहे.
ओम सुर्याय नमः शहस्र कीर्णयाधीम स्वाहा.
मित्रानो या मंत्राचा 108 वेळा मनोभावे जप करायचा आहे. त्यानंतर या नोटेला व त्यामधील सर्व सामग्रीस धूप दीप दाखवायचं आहे. नंतर ही नोटे आपण आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी जो तुमचा कॅश बॉक्स,गल्ला आहे त्या ठिकाणी ठेऊ शकता.
लक्षात घ्या ज्याठिकाणी तूम्ही ही नोटे ठेवाल, त्याठिकाणी अपवित्र वस्तू नसतील, स्वछता नसेल घाणेरडेपणा नसेल याची काळजी घ्या.
विशेष करून तुम्ही पर्स मध्ये किंवा पाकीट मध्ये ही दाहरूपायची नोटे ठेवणार असाल तर ते पर्स किंवा पाकीट हे जनाव राच्या का तडी पासून बनवलेला नाही याची काळजी घ्या.
अनेक लोक उपाय तर करतात मात्र अश्या या छोट्या छोट्या चुका आपला उपाय विफल बनवतात.
मित्रांनो आपण जर आपल्या घरात आपल्या वास्तू मध्ये ही नोटे ठेवणार असाल तर आपली तिजोरी ज्या ठिकाणी आपले पैसे, सोने, नाणे, अलंकार, दागदागिने ठेवता त्याठिकाणी आपण ही दहा रुपयांची नोटे ठेऊ शकता.
मात्र ज्या ठिकाणी कर्जाची कागद पत्र आहेत, मोठी बिल आहेत, ज्या ठिकाणी तुमचा पैसे तुमच्या पासून दूर गेला आहे, अश्या ठिकाणीमात्र हि नोट आपल्याला ठेवायची नाहीये.
मित्रांनो तुम्ही जेव्हा जेव्हा माता लक्ष्मीची तूम्ही पूजा कराल तोच शुक्रवार असेल, पूर्णिमा किंवा अमावस्या असेल त्या प्रत्येक तिथीस ही नोट त्यातील समग्रीसोबत माता लक्ष्मीच्या चरणी नक्की ठेवा.
आणि पूजा संपन्न झाल्या नंतर ती नोट त्याच्या मुळ जागी परत ठेऊ शकता. जो पर्यंत ही नोट तुमच्या जवळ आहे तोपर्यंत पैश्यांचा निरंतर प्रवाह तुमच्या कडे सातत्याने वाहत राहील.
विशेष करून ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य मजबूत आहे अश्या लोकांनी हा उपाय अवश्य करावा, किंवा ज्यांच्या जन्म तारखेचा मूलांक एक येतो म्हणजे काय तर ज्यांची जन्म तारीख एक आहे दहा आहे एकोणविस आहे अठ्ठावीस आहे अश्या लोकांसाठी का उपाय अगदी रामबाण आहे.
इतर लोकांनी सुद्धा हा उपाय करावा आणि त्यातल्या त्यात दहा रुपायाची अशी नोट ज्याची बेरीज एक येते, लक्षात घ्या.
नोटे वरील सर्व अंकांची बेरीज पंचावन्न आली दहा रुपयाच्या नोटेवरच्या. तर पाच अधिक पाच दहा होतात म्हणजे एक आणि शून्य म्हणजे मूलांक एक आला.
किंवा नोटेवरच्या अंकांची बेरीज शंभर आली, तरी सुद्धा मूलांक एक येतो. बेरीज त्र्याहत्तर किंवा सदतीस अली तरी सुद्धा मूलांक एक येतो.
तर अश्या प्रकारे नोटेवरच्या संख्यांची बेरीज करून मूलांक एक येत असेल तर ती नोट या उपायासाठी अगदी उपयुक्त आहे. नक्की करून पाहा माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठीचा हा अत्यंत साधा उपाय.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.